क्रिडा

आयपीएल क्रिकेट सट्टयावर धाड ४ आरोपी ताब्यात

  • भंडारा – भंडारा स्थागुशा ची कारवाई भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एका घरामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन ‘आयपीएल’ क्रिकेट सट्टयावर भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाच्या अधिकाNयांनी धाड टाकुन चार आरोपींना अटक केली.त्यांच्या ताब्यातुन नगदी व इतर साहित्य अशा एकुण ११ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. महेंद्र सहदेव मेश्राम वय २७ वर्ष, वीरेंद्र भाविक काठाने वय ३१ वर्ष, संजय हंसराजसाठवणे वय २९ वर्ष तिघेही रा. गोवर्धननगर, तुमसर व निलेश शिवकुमार साठवणे वय २८ वर्ष,रा. गांधीवार्ड, तुमसर अशी आरोपींची नावे आहेत.सध्या देशात आयपीएल क्रिकेट चे सामने खेळले जात असुन त्यावर मोठया प्रमाणात सट्टा खेळला जात आहे.तुमसर येथेसुध्दा आयपीएल क्रिकेट सामन्यावर लाखो रूपयांचा सट्टा खेळला जात असल्याची माहिती भंडारा स्थागुशाचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे भंडारा स्थागुशाच्या अधिका-यांनी तुमसर येथील गोवर्धनगरातील एका घरामध्ये धाड टाकली असता तिथे काही इसम ऑनलाईन आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळत असल्याचे आढळुन आले. पोलीसांनी घटनास्थळावरून चार आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील ३ मोबाईल संच,आयपीएल चे आकडे लिहील्या जाणारी पट्टी व साहित्य तसेच नगदी तीन हजार रूपये असा एकुण ११ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Whatsapp group