अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे माजी आमदार स्व.कांतीजी कोळी साहेब यांचे जयंतीनिमित्त विविध उपक्रम संपन्न
जळगांव – मा.श्री.परेशभाई कांतिजी कोळी साहेब, प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली (रजि.) यांचे आदेशानुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री.महादेव शहाबाजकर साहेब व राज्य कार्यअध्यक्ष मा.श्री.सिद्धार्थ दादा कोळी यांचे सूचनेनुसार व राज्य सचिव मा.श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे यांचे मार्गदर्शनाने व जळगाव जिल्हा अध्यक्ष मा.श्री.प्रविणकुमार दंगल बाविस्कर सर यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य सेवा मेडिकल फाऊंडेशन जळगाव संचलित रेडप्लस बॅल्ड सेंटर जळगाव यथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता.
स्व.कांतिजी कोळी साहेबांची 75 वी जयंतीनिमित्त (75) पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करत पंच्याहत्तर बॅगा रक्त संकलीत करण्यात आले. तसेच सावखेडा शिवारातील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रमात तेथील आजी-आजोबांना अन्नदान कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रेडप्लस ब्लड बँक सेंटर चे डॉ. जी.आर.भोळे,(B.T.O.), डॉ. भरत गायकवाड, डॉ.अमोल शेलार, डॉ.निलेश गांगोडे, डॉ.दिपक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्व.कांतीजी कोळी साहेबांचे जन्मोत्सवा साठी जिल्हाभरातील अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह सदस्य व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी राज्य सचिव मा.श्री.अनिल दादा नंन्नवरे,जळगाव जिल्हा अध्यक्ष मा.श्री.प्रविणकुमार दंगल बाविस्कर सर, युवक अध्यक्ष मा.श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंखे, उपाध्यक्ष मा.श्री.सुकदेव भाऊ लक्ष्मण रायसिंग, उपाध्यक्ष श्री.किशोर भाऊ पंढरीनाथ सपकाळे,जळगाव तालुकाध्यक्ष मा.श्री.रमेश दादा शामराव सपकाळे, धरणगाव तालुकाध्यक्ष मा.श्री.रामचंद्र दादा मुरलीधर सोनवणे, युवा सचिव मा.श्री.लिलाधरभाऊ सोनवणे,युवक अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ गोपालशेठ नंन्नवरे,मा.श्री.भिकनदादा नंन्नवरे, यावल तालुका युवक अध्यक्ष श्री.विकासभाऊ (गोटूशेठ )साळूंके श्री.विजय काशिनाथ मोरे, श्री.आकाश निवृत्ती सपकाळे,श्री.रविंद्र सदाशिव नंन्नवरे,श्री.अजय कोळी,श्री.समाधान संतोष कोळी,श्री.देवेंद्र रमेश कुमावत,श्री.राजेंद्र रामदास चौधरी,श्री.कुंदन रमेश सपकाळे,श्री.सचिन संतोष बाविस्कर, श्री.प्रमोद रामदास नंन्नवरे,श्री.अक्षयभाऊ मोरे,श्री.राहूल भाऊ रायसिंग, श्री.गणेश कोळी,श्री.रविंद्र सैंदाणे, श्री.चंद्रकांत तायडे,श्री.मोहन विष्णू सपकाळे,श्री.विजय कोळी,श्री.योगेश कोळी,आदी पदाधिकाऱ्यांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिश्रम घेतले.