पोलीस मित्र संघटनेच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष पदी निवड ईश्वर चोरडिया यांची निवड
जामनेर – तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार, तसेच मा श्री जीएम भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या शिफारशीनुसार व मा श्री सुनील भाऊ पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या वतीने मा श्री ईश्वर मुळचंद चोरडिया यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष या पदावर निवड नियुक्ती करण्यात आली आहे. ईश्वर चोरडिया यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील कार्याच्या अनुभवातून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ईश्वर चोरडिया यांच्या माध्यमातून पोलिस मित्र संघटनेचे महत्त्व ओळखून पोलिस व नागरिकांना मदत करीत संघटनेची प्रतिमा जनसमुदाय मध्ये उज्वल करून आणि संघटनेचा जनाधार मजबूत करून कार्य करणार असल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.