श्रीमती कल्पना विसावे-मोरे यांचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान…
धरणगाव – येथील पी.आर.प्राथमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका कल्पना विसावे- मोरे यांंना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद,जळगाव तर्फे प्रसिद्ध विचारवंत श्रीपाल सबनीस व प्रदेशाध्यक्ष भरत सिरसाट आणि नामवंत अतिथितींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र,शालश्रीफल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष डी.के.अहिरे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले शिक्षकांनी संघटीत होऊन समाजात वावरताना प्रमुख भूमिका पार पाडावी, प्रमुख अतिथी श्रीपाल सबनीसांनी सांगितले की शिक्षकांनी थोरांंचे,महान क्रांतिकारकांचे,संतांचे विचार अंगीकारावेत आणि दुर्जनांचा कर्दनकाळ होऊन समाजप्रबोधन करावे, ज्ञानदान करावे आणि आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे. असे सांगितले. प्रास्ताविक डी एम मोतिराळे यांनी केले. सूत्रसंचालन प.जिल्हाअध्यक्षा मनिषा देशमुख यांनी केले. यावेळी बारा माध्यमिक, अठरा प्राथमिक, दोन उच्च माध्यमिक आणि चार राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्याध्यक्ष भरत सिरसाट यांनी संघटनेचे ध्येय धोरणे सांगितले. विविध प्रकारच्या समस्या, एकीच्या बळावर सोडवता येतात आणि पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते असे सांगितले.आभार पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष रंजित सोनवणे यांनी मानले. जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे पी.आर.सोसायटी चे अध्यक्ष डॉ अरूण कुलकर्णी, सचिव डॉ मिलिंद डहाळे आणि संचालक मंडळाने अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.