जिल्हा परिषद केंद्र शाळा तामसवाडी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
पारोळा – (तामसवाडी) जिल्हा परिषद केंद्र शाळा तामसवाडी बॉयज येथे शनिवार दिनांक 07-01-2023 रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे आयोजक शाळेतील कर्मचारी वर्ग मुख्यअध्यापक किरण एकनाथ कुलकर्णी, उपशिक्षिका छाया देवराम पवार, उपशिक्षिका प्रेरणा रामदास गोसावी उप शिक्षक किरण सुभाष महाजन यांनी केले या मेळाव्याचे उद्दिष्टे असं कि लहानपणा पासुनच मुलांना आर्थिक व व्यवहारिक दृष्टया ज्ञान आले पाहिजे व शिक्षण घेत असतांना आर्थिक दृष्ट्या सक्षम कसं होता येईल व येणाऱ्या काळातील बाबी लक्षात घेत सक्षम कसं होता येईल हा होता या बाल मेळाव्याला नावीण्यपूर्ण प्रतिसाद देत गावातील नागरिक उपस्थित होते उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.सरपंच हिरामण राजाराम पवार मा.तंटामुक्ती अध्यक्ष अनिल बाबुलाल पवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काशिनाथ पवार तामसवाडी हायस्कूल चे मुख्यअद्यापक ए.के.चव्हाण सरकन्या शाळेचे मुख्यअद्यापक सुभाष गवळे सर यांचा हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी गावातील ग्राम पंचायत सदस्य तामसवाडी हायस्कूल चे कर्मचारी वर्ग व तामसवाडी आंगणवाडी चे कर्मचारी वर्ग व गावातील नागरिक महेंद्र सैयाजी, मिलिंद पवार, सुरेश धोबी, प्रवीण बिरारी, गिरीष पवार, अक्षय पाटील, समाधान खेडकर, आबा भोई, कैलास पवार, मधुकर महाजन, शंकर भोई, योगेश नावरकर, उमेश महाजन, योगेश महाजन,आदी उपस्थित होते.