जळगांव – धरणगाव येथे होणार भव्य कुस्त्यांची दंगल
धरणगाव : येथील चंदन गुरु क्रिडा प्रसारक मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने दिनांक 25 एप्रिल, मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात भव्य खुल्या कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत परप्रांतीय मल्लांचा नियोजित शानदार इनामी मुकाबला व खुल्या कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर पहेलवान (महाराष्ट्र केसरी, काका पवार यांच्या पट्टा, पुणे.) हमिद इराणी पहेलवान (एशिया गोल्ड मेडलिस्ट), विजय सुरुडे पहेलवान (महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे) मोहमद हबीज पहेलवान (जसराम गुरु आखाडा, दिल्ली) असे अनेक नामवंत मल्ल सहभागी होणार आहे. सकाळी 11 ते 4 या वेळेत कुस्त्यांची जोड बांधण्यात येइल. रसिक प्रेक्षक व कुस्ती प्रेमींनी मोठया संख्येन या दंगलीचा आनंद घेण्याचे आवाहन चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाने केले आहे.