वादळी वाऱ्यामुळे यावल तालुक्यातील नुकसानीची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी
प्रतिनिधी – उमेश कोळी
जळगाव – दि.२९ मे रोजी जिल्ह्यातील यावल तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वड्री, मोहराळा, कोरपावली, हरिपुरा, कोळवद ई. शिवारात झालेल्या नुकसानीची महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच यावर तत्काळ योग्यती कार्यवाही करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. याआधी एप्रिल महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर व यावल तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न चालू असून, त्यासोबत आता झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देणेबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आश्वासन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिला.यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह श्री.हर्षल पाटील, जिला अध्यक्ष किसन मोर्चा श्री.नारायण बापू चौधरी, तालुकाध्यक्ष श्री.उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस श्री.विलास चौधरी, श्री.उज्जैनसिंग राजपूत, माजी जि.प.सदस्य सौ.सविता भालेराव, सौ.कांचन फालक, बाजार समिती संचालक श्री.राकेश फेगडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.सागर कोळी, तालुका उपाध्यक्ष श्री.किशोर पाटील, यावल शहराध्यक्ष श्री.निलेश गढे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाधयक्ष श्री.हेमराज फेगडे, बाजार समिती संचालक श्री.पंकज चौधरी, सरपंच वड्री श्री.अजय भालेराव, श्री.संजय पाटील, श्री.लहू पाटील ई. उपस्थित होते.