ताज्या बातम्या

जळगांव – ज्ञानोबा तुकाराम जयघोषात धरणगावात निघाली पी.आर. हायस्कूलच्या बालगोपालांची पर्यावरण दिंडी

धरणगाव – येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी हातात टाळ मृदंग आणि भगवे झेंडे घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात गावात पर्यावरण दिंडी काढली.
प्रारंभी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा ठेवलेल्या पालखीचे पुजन मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ,यू.एस.बोरसे ,व्ही.एच.चौधरी, एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. धरणगाव येथील ह.भ.प.भगवान महाराज यांच्या वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांनी हातात टाळ, मृदंग, वीणा आणि विठ्ठलाचा जयघोष करीत ठेका धरला. तर नऊवारी लुगडे नेसलेल्या मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन ,पर्यावरणाचा संदेश देणारे फलक आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन परिहार चौक, बस स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ रिंगण सोहळा केला.या विद्यार्थ्यांना डॉ.बी.डी.शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. नवनीत सपकाळे, जी.आर. सूर्यवंशी, एस.पी.सोनार,डी.एच.कोळी, एन.सी.पाटील, डॉ.वैशाली गालापुरे यांनी त्यांना सहकार्य केले. या पर्यावरण दिंडी मुळे शहरातील वातावरण विठ्ठलमय झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *