जळगांव – धरणगाव येथील कृष्ण गीता व जी एस नगर मधील रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ; नगरपालिकेस दिले निवेदन !
चिखलामुळे शाळकरी मुलांना व कॉलनीतील बंधु – भगिनींना होतोय त्रास !…
धरणगाव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील जीएस नगर व कृष्ण गीता नगर येथे पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. नगर परिषदेचे प्रशासक मा.जनार्दन पवार साहेब यांनी आमच्या रस्त्यांकडे लक्ष द्यावे व तात्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी आशा कॉलनीवासी व्यक्त करीत आहेत. दरवर्षी निवेदन देऊनही कोणीही दखल घ्यायला तयार नाही !…. कॉलनिवासीयांनी किती निवेदन द्यायची ?.. अक्षरशा: फाईल निवेदनांची भरलेली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कॉलनीवासियांना पावसाळा आला की अंगावर काटे उभे राहतात व हा ऋतू यायला नको असे वाटते !प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी हीच नम्र अपेक्षा कॉलनीवासी करीत आहेत.
आज रोजी कृष्ण गीता व जी.एस. नगर येथील रहिवाशांनी नगर परिषदेचे संजय मिसर यांना निवेदन देऊन सर्व हकीकत सांगितली. याप्रसंगी कृष्ण गीता नगर येथील बी एम सैंदाणे, विनायक न्हावी, महेंद्र सैनी, जे एस पवार, एस एन कोळी, संजय सुतार, गोकुळ महाजन, प्रल्हाद विसपुते, पी डी पाटील, बाळू अत्तरदे, जी एस नगर येथील सुधाकर मोरे, भोई दादा , अजय मैराळे तसेच सर्व कॉलनीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.