ताज्या बातम्या

चोपडा जैन समाजातर्फे जैन मुनीश्री हत्येच्या निषेधार्थ प्रशासनाला निवेदन

लोकनायक न्युज प्रतिनीधी लतीश जैन

अल्पसंख्याक शांतता व अहिंसावादी समाजाला न्याय मिळण्याची मागणी

चोपडा – समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या आणि स्वकल्याणाबरोबर परकल्याणासाठीतदवत सर्वप्राणीमात्रांचे कल्याण व्हावे अशी भावना मुनिश्रींची सदैव असते असे अहिंसा पालन करणारे जैन मुनिश्रींची समाजकंटकांनी आचार्य प.पू श्री 108 कामकुमार नंदिजी महाराज कर्नाटक राज्यात बेळगांव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात नंदी पर्वत स्थित जैन तीर्थावरती स्थित असलेले आचार्य पूज्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घुन हत्या करण्यात आली .हत्याऱ्यांनी मृत शरीराचे तुकडे तुकडे करून बोरवेल मध्ये फेकून क्रूरतेची सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. स्वतंत्र भारतात ह्या हत्या कांडने देशाच्या गौरवशाली इतिहासावर लांझन लागले. या घटनेमुळे भारतातील नाही तर जगातील संपूर्ण जैग समाजात असंतोष पसरला आहे. चोपडा सकल जैन समाजातर्फे दि. २० जुलै (गुरुवार) रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात सदर माहितीचा उल्लेख करण्यात आले असल्याची माहीती भविष्यात सर्व जैन मुनिश्रींची सुरक्षा कायम राहावी यासाठी निवेदन देण्यात आले त्यात केवळ पुरुषांचे स्वाक्षऱ्या नसून महिलाही पुढे सरसावल्या त्यांनी सुद्धा निवेदनात स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला पुढे म्हणाल्या अनेकांचे श्रद्धास्थान असलेले जैन तपस्वी त्यागीवृंद संतामुळे भारताची संस्कृती टिकलेली असून ऋषी कृषी प्रधान देशात संतांचे हत्या होत असतील तर ही मोठी दुर्दशाची गोष्ट आहे मुळातच भारत संतांची पवित्र पावन भूमी आहे. भारतीय संस्कृतीवर साधू संतांचा मोठा प्रभाव आहे. विश्वबंधुत्वाच्या भावनेला बळकट करण्यामध्ये जैन तपस्वी वृंदाचे नाव अग्रक्रमाने येते साधुसंत हे राष्ट्रीय संपत्ती आहे अश्या संपत्तीचे हत्या होणे ही मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल जैन समाज हा अल्पसंख्यांक असून शांतता व अहिंसावादी आहे जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आम्हाला सहकार्य करून योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती निवेदनात केली आहे .मुनीश्रींचा हत्येचा कट ज्यांनी रचला त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ही चोपडा सकल जैन समाजाने केली आहे.यावेळी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदीर संस्थान चोपडा,श्री 1008 चंद्रप्रभु महाराज दिगंबर जैन मंदीर संस्थान चोपडा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघ चोपडा, तारण तरण जैन समाज चोपडा आदी समाजाचे जण समुदाय उपस्थित होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *