ताज्या बातम्या

तेविसाव्या शतकात देखील चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द हे गाव भ्रमणध्वनी संपर्कापासून वंचित

चोपडा – निवडणुका जवळ आल्या की, राजकारणी मत मागायला येतात व खोटे आश्वासन देऊन आपले ध्येय साध्य करतात. निवडून आले की काय समस्या आहेत ? आपण काय आश्वासन दिले आहे ? हे सर्व काही विसरून जातात. अशीच परिस्थिती चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द गावातील आहे. आजच्या युगात तेविसाव्या शतकात देखील चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द हे गाव भ्रमणध्वनीच्या संपर्कापासून वंचित आहे.

भ्रमणध्वनीच्या संपर्कापासून गाव दूर असल्याने गावातील नागरिकांचे नातेसंबंधात कुणीही मयत झाले की, त्याचा साधा निरोपही लागत नाही. दोन चार दिवसांत प्रत्यक्ष नातेसंबधातील व्यक्ती योतो तेव्हा ती माहिती कळते. आजच्या युगात देखील संपर्क होत नसल्याने गाव देशाच्या बाहेर आहे का ? असा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वाभिमानी एका युवकाने हा प्रश्न उपस्थित केला आहे. स्वाभिमानी युवाशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष लोकेश अनिल पाटील व पदाधिकारी यांनी ताबडतोब जळगाव येथील (बीएसएनएल) BSNL चे कार्यालय गाठले आणि तेथील अधिकाऱ्यांना लवकरात लवकर एक टॉवर बसविण्याची मागणी केली आहे. तेथील अधिकाऱ्यांनी ही समस्या जाणून घेतली व टॉवर बसवण्यासाठी हिरवा सिग्नल दिलाय याबद्दल गावकऱ्यांनी स्वाभिमानी युवाशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष लोकेश अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत. आता लवकरच आपली समस्या सुटेल अशी आशा गावकऱ्यानी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *