चोपडा येथील ग्रामसेवक कॉलनीत दोन ठिकाणी चोरी ७० हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार
चोपडा – येथील ग्रामसेवक कॉलनीत संजय भिलाजी पाटील हे देव दर्शनासाठी परिवारासह पंढरपूर गेले असता चोरट्यांनी डाव साधत त्यांचा राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून ५५ हजार रुपये रोख ,सोनी कंपनीचा एल. ई.डी टीवी,प्रतेकी चार भार वजनाची गणपतीची व लक्ष्मी ची मूर्ती. तसेच आत्माराम मोहन कोळी रा.ग्रामसेवक कॉलनी यांचा घरातून देवघरात ठेवलेले ५२०० रुपये रोखअसा दोन्ही घरातून एकुण ७०हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले घटना सकाळी त्याचे शेजारी दिलीप जोशी (महाराज) आत्माराम मोहन कोळी यांचा निदर्शनास आली असता त्यांनी त्यांनी फोन वर घरमालकाला घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली घरमालकाचा फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम ४५४,४५७,३८०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या चोरीचा घटनेमुळे कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले.