सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल राहुल राहुजा यांचा शिवसेना तर्फे सन्मान
धरणगाव – येथील उद्योजक मनोज राहुजा व रिया राहुजा यांचे चिरंजीव राहुल मनोज राहुजा याने सी ए परीक्षेत विना क्लास घरीच अभ्यास करून यश संपादन केले त्याच्या या यशाचे कौतुक म्हणून धरणगाव शहर शिवसेना ( उ बा ठा )ने राहुल ला भविष्यात प्रोत्साहन मिळावे म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी, शहर प्रमुख भागवत चौधरी, माजी नगरसेवक जितू धनगर, किरण मराठे, युवासेना शहर प्रमुख पप्पु कंखरे, लष्मण महाजन, तालुका समन्वयक संतोष सोनवणे उपतालुका प्रमुख परमेश्वर महाजन व्यापारी सेना तालुका प्रमुख दिनेश येवले विनोद रोकडे , अक्षय मुथा, शरद शिरसाठ, राजमल संचेती , प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सामन्य कुटुंबातील विध्यार्थी यश संपादन केल्या ने त्यांचे सर्वदूर कौतुकाचा वर्षाव होत आहे.