केस पेपर मोफत केल्याने उपजिल्हा रुग्णालयात अनावश्यक गर्दी वाढली ; औषधींचा दुरुपयोग
प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील
चोपडा – शासनाच्या निर्णयानुसार उपजिल्हा रुग्णालयात दीनदुबळ्यांना सहकार्य व्हावे व त्यांची सेवा व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केस पेपरही मोफत द्यावे असे आदेश काढले आहेत परंतु यात खरा लाभार्थी राहून जातोय. आणि ज्याला आवश्यक आहे तो मात्र विना औषधीचाच राहून जातोय अनावश्यक केस पेपर काढून आपले औषध पाणी घेताना दिसत आहे मोफत केस व्यापार असल्याने एक एक माणूस तीन तीन चार चार केस पेपर काढत त्यांना आढळून येत आहे यामुळे सर्व केस पेपरवर औषधी घेऊन मोकळा होत आहे शासनाच्या आदेशाने केस पेपर मोफत द्यावा ही योजना सुरू केली ही दीनदुबळ्यांसाठी चांगली असली तरी मात्र तिच्या अपव्यय थांबला पाहिजे असे सामान्य जनतेकडूनच बोलले जात आहे सामान्य जनता बोलतांना सांगते की कमीत कमी दहा रुपये केस पेपरचे होते तेव्हा तरी बरं होते परंतु आता मात्र अतोनात हाल होत आहे सूत्रांकडून माहिती मिळालेल्या नुसार दहा रुपये केस पेपर असताना जवळपास उपजिल्हा रुग्णालयात तीनशे ते सव्वा तीनशे रुग्ण आपले तपासणी करून घेत होते मात्र आता केस पेपर मोफत झाल्यापासून जवळपास 700 ते 800 केस पेपर हे दिले जात आहे आणि हा केस पेपर दुसऱ्या दिवशी येताना पेशंट किंवा रुग्ण घेऊन येत नसल्याने काल त्याने कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या हेही सांगता येत नसल्याने डॉक्टरांची मोठी फजिती होत आहे डॉक्टर आजची परिस्थिती पाहून त्याला गोळ्या लिहून देतात व तो सर्रास त्या गोळ्या घेऊन टाकतो कालच्या घेतलेल्या गोळ्या ह्या फेकून देतो किंवा घरात राहू देतो आणि दुसऱ्या दिवशी दिलेल्या गोळ्या घ्या परत घेतो परत तिसऱ्या दिवशी आला तर तो रुग्ण परत औषधी लिहून घेतो. म्हणजेच एकच रुग्ण तीन दिवसात तीन वेगवेगळ्या गोळ्या किंवा औषधी घेत असल्याने त्याला फरक पडत नाही त्याने तीन दिवसात तीन खोकला च्या बाटल्या टॉनिकच्या बाटल्या तसेच अँटिबायोटिक गोळ्या घेत असल्याने त्याला लागणारा डोस पेक्षा जास्त औषधी त्याच्या घरात जात असते त्यामुळे काही खोकलांच्या बाटल्या अँटिबायोटिक च्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या ठराविक रुग्ण बाहेर मार्केटमध्ये विकत असल्याचे देखील येथील सामान्य जनतेतून सांगण्यात आले मोफत केस पेपर घेण्याच्या वेळी आधार कार्ड सक्तीचे असले तरी मात्र शेकडो पेशंट हे आधार कार्ड आणत नसल्याने केस पेपर देणे बसलेल्या इसमास आवश्यक होऊन जाते अन्यथा तो रुग्ण केस पेपर वाटणाऱ्यांला उंच आवाजात बोलणे सुरू करतो यामुळे केस पेपर देणाऱ्याला केस पेपर देणे आवश्यक होत असते यामुळे औषधींच्या तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे कालच्या केस पेपर आणल्याशिवाय आज कोणत्याही डॉक्टरांनी औषधी लिहून देऊ नये म्हणजेच औषधी घेण्यावर आळा बसेल कोणत्याही आजाराला तीन पाच सात अशा दिवसांचे डोस पूर्ण करावा लागतो तेव्हाच तब्येतीत फरक पडतो. परंतु रोज नवीन औषधी घेऊन कोणत्याही गोळीचा त्या रुग्णाला असर होत नसल्याने तो महिने दोन दोन महिने पर्यंत औषध खातच राहतो या सर्व बाबी आज उपजिल्हा रुग्णालयात फेरफटका मारताना निर्देशनात आल्या यावर इन्चार्ज म्हणून प्रतिक्रिया घेतली प्रतिक्रिया – डॉक्टर सुरेश पाटील यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता यांनी सांगितले की, यावर आम्ही कालच सर्वांची मीटिंग बोलवली व उपाय योजना काय करावी याचे नियोजन चालू आहे व औषधी बाहेर विकणारा सापडला तर त्यावर नक्कीच पोलीस कारवाई करू असे सांगितले व अनावश्यक केस पेपर घेऊन जाणाऱ्यांना सुद्धा आळा बसवण्यासाठी आम्ही उपायोजना आखलेली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय हे खाजगी गाड्यांचे पार्किंग सेंटर होऊन गेलेले आहे असे विचारले असता त्यावरही त्यांनी सांगितले की तोही विषय आम्ही मिटिंग मध्ये घेतलेला आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या गाड्या उभ्या राहत होत्या त्यांना स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की यापुढे इथे कोणतीही गाडी लागणार नाही अन्यथा आणि पोलिसांमध्ये जमा करू अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.