ताज्या बातम्या
अडावद-महिलेस अपमानास्पद वागणूक देणारे सहायक पोलिस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांना निलंबीत करा
प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मीनाबाई कोळी यांनी उपोषणास बसणे बाबत दिले निवेदन
चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा आणि दोन पोलीस कर्मचारी जगदीश कोळंबे, सतिष भोई यांनी हुकूमशाही पध्दतीने केलेल्या मनमानी कारभाराबद्दल तक्रार दिनांक १७/८/२०२३ रोजी सादर केली होती.सदर तक्रारीची चौकशी निवारण अद्यापपावेतो झालेली नाही.त्या संदर्भात मी दिनांक ११/०९/२०२३ रोजी ठीक १०. ११:०० वाजता अडावद पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर अन्नत्याग आमरण उपोषण करीत आहे.जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी खंबीरपणे उपोषण करेल यांची नोंद घ्यावी.अशा आशयाचे निवेदन मीनाबाई रामेश्वर कोळी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले.