न.पा.सत्ताधारी विरोधकांच्या कैकयी हट्टापायी ६० ते ७० कोटींची विकास कामे हुकली ; माजी आमदार प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणेंची खंत
प्रतिनिधी – विनायक पाटील
चोपडा – तालुक्यात लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालयाचे दिग्गजांचे उपस्थितीत लोकार्पण♦️ दारू उत्पादन शुल्क विभाग कार्यालय भूमिपूजन♦️ भुयारी गटारींचे काम सुरू होणार जोमाने♦️ शहरभर ८५ कोटींचे रस्तेतालुक्यातील आदिवासी भागासह शेतकऱ्यांना जीवन संजीवनी ठरणाऱ्या हंड्या कुंड्या धरण हे पूर्णत्वास नेणे हे माझे ध्येय असून ते मी पूर्ण करण्यासाठी जीव ओतून काम करीत आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या चेहऱ्यावरील हास्य पाहणे हेच माझे स्वप्न असल्याचे मत माजी आमदार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील यांच्याशी बोलतांना व्यक्त केले. दिवाळीनिमित्त औपचारिक चर्चेत पत्रकारांशी हितगुंज करतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले.येत्या डिसेंबर महिन्यात चोपडा तहसील कार्यालय हे नव्या प्रशासकिय इमारतीत स्थलांतरित होणार असून दिग्गज मंत्र्यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्याच दिवशी दारु उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशस्त कार्यालय भूमिपूजन सोहळाही पार पडणार आहे. खरं तर मी आजतागायत कोणावरही टीका टिप्पणी करीत नाही.असे असतांना राजकीय द्वेषापायी विकास कामांना विरोध होणे हे सद्सदविवेक बुध्दी ला पटेनासे आहे पण विनाश कालीन विपरीत बुद्धी असलेल्या बुद्धीजींवींची कीव करावीशी वाटते.विकासाला विरोध करण्याचे धाडस करणे म्हणजेच स्वतः च्या पायांवर धोंडा मारून घेण्या सम आहे.जनता अशांना जाणून असून त्यांना चांगलाच धडा शिकवेल त्यासाठी काही डंगरी शाळा भरण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांत शहरात भुयारी गटारींचे काम जोमाने सुरू होतील त्यानंतर संपूर्ण शहराचे रस्त्यांचा कामे झपाट्याने सुरू करून कायापालट केला जाईल.विरोधकांच्या कारकिर्दीत आमच्या कामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास आडकाठी निर्माण केली जात होती.परिणामी ६० ते ७० कोटींचे विकास कामे शहराने गमावले आहेत. हे सुध्दा जनतेला माहिती असून जनतेच्या मनात त्याची खदखद आहे. येत्या काळात ५० कोटींच्या विकास कामे नव्याने सुरू होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.कार्यसम्राटआमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अथक परिश्रमाने शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास साधून गोरं गरीब जनतेच्या आशापूर्तीसह सुंदर,स्वच्छ व विकसनशील तालुकाच्याचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेही अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.