राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहर चिटणीस पदी शिवरत्न बादगुडे यांची निवड
पुणे – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहर चिटणीस पदी शिवरत्न बादगुडे यांची निवड नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते शिवरत्न बादगुडे यांना नियुक्ती पत्र देवून त्यांची निवड करण्यात आली. यावेळी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, ज्योती पचारणे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा. खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, मा.खा. सुप्रियाताई सुळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना. जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष मा. महेबुबभाई शेख, प्रशांत सुदामराव जगताप (अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. नियुक्ती पत्रावर किशोर हनुमंत कांबळे अध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अजिंक्य सोमनाथ पालकर कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेस, दिपक विलास कामठे कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या स्वाक्षरी आहेत.