ताज्या बातम्या

लग्न मोडल्याच्या संशयावरून महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीस मारहाण ; चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत कैलास बाबुराव बोरसे ,आशिष कैलास बोरसे, सतीष बाबुराव बोरसे ,उज्वल सतीष बोरसे सर्व रा. अनवर्दे ता. चोपडा जि. जळगाव यांनीदि .11 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या आशिष कैलास बोरसे च लग्न मोडल असल्याचा संशय घेवुन संगन मत्ताने फिर्यादी महिला व फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्कायानी मारहाण करुन फिर्यादीच्या छातीवर व हातावर ओरबाडून सदर मारहाणीत फर्यादीचा गळ्यातील पोत तुटून खाली पडुन नुकसान केले व फिर्यादीचे ब्लाउज फाडुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी चार ही पो स्टेशन भारतीय न्याय सहिता ७४.११५ (२),३५२,३५१(२), ३ (५),३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेका गणेश मधुकर पाटील करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *