भक्ती स्थळावर भक्तांची मांदियाळी ; हजारो भक्तांनी घेतले राष्ट्रसंतांच्या संजीवन समाधीचे दर्शन
देवा पेक्षाही सद्गुरु श्रेष्ठ राजशेखर शिवलिंग शिवाचार्य
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपूर गुरुराज माऊली वंदे मातरम चा गजरामध्ये भक्ती स्थळावरती राष्ट्रसंतांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भक्ताची मांदियाळी दिंडी पताका ध्वज विनाकार मृदंगाच्या गजरात हजारो भाविक भक्त गुरुराज माऊलीचा गजरामध्ये भक्ती स्थळावर दाखल झाले रात्रीपासूनच भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सकाळी सहा वाजता राष्ट्रसंतांच्या मूळ संजीवन समाधीचे दर्शनासाठी भक्तांसाठी खुली करण्यात आली यावेळी राष्ट्रसंतांचे उत्तर अधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आलेल्या भक्तांना गुरुतिर्थ व प्रसाद देण्यात आला तो, उदगीर क्षेत्रफळ लोहारा हळी हंडरगुळी सह अनेक गावातील भावीक पायी दिंडीने भक्ती स्थळावर आले होते यावेळी दिंडीचे नेतृत्व रतिकांत महाराज तोडार कर चंद्रकांत हाईबातपुरे. दिंडी त भजन करीब उपस्थित होते भक्ती स्थळावर भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी महाराज अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभारगेकर सिद्धेश्वर मुन्ना पाटील मन्मथ पालापुरे शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे आ. बाबासाहेब पाटील ओम पुणे, राजकुमार कल्याण अनिल कासनाळे, रामलिंग तत्तापुरे, शिवानंद हेगने अभय मिरकले चौधरी रवी महाजन शिव प्रसाद कोरे धन्यकुमार शिवणकर ऍडव्होकेट गंगाधर कोदळे एडवोकेट बाबुराव देशमुख शीलाताई शेटकर शिवलिंग पाटील किनीकर विश्वनाथ स्वामी वडवळकर पद्मिनी ताई खराडे रजनीताई मंगलगे उमाकांत शेटे दत्ता खकरेसह अनेक कीर्तनकार प्रवचनकार व भजन करी उपस्थित होते यावेळी शिवशंकर घंटी परभणी व कळसे उदगीर यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले आरती प्रसाधनंतर संजीवन समाधीचे भुयारी द्वार बंद करण्यात आले.
देवा पेक्षाही सद्गुरु व संत श्रेष्ठ राज शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज मानवी जीवनाला भवसागरातून पार करण्याची शक्ती गुरुमध्ये आणि गुरुतीर्थांमध्येच आहे जीवनात अनेक गुरु असले तरी सद्गुरु हा सन्मार्ग दाखवणारा असल्याने तो सर्वश्रेष्ठ असल्याचे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी प्रतिपादन केले ते गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भक्ती स्थळावरती गुरुतीर्थप्रसाद कार्यक्रमाच्या आशीर्वाचनात बोलत होते.