मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने तालुक्यात प्रत्येक शाळेत सुरक्षा व्यवस्था करा
वाशिम / रिसोड प्रतिनिधी – पंढरी पाटील गायकवाड
राज्यात महिला व लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांन मध्ये सातत्याने वाढ होत आहे आपल्या ही तालुक्यात अश्या घटना घडू शकतात ,अत्याचाराच्या कुठल्याही घटना घडण्या आगोदर काळजी घेणं आणि त्या नुसार उपाययोजना करण हे सामजिक घटक म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.
आणि त्याचं पार्श्वभूमी वर खबरदारी म्हणून रीसोड शहरातील तरुणांनी आणि पालकांनी मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने रिसोड तहसील कार्यशेत्रात येणाऱ्या सगळ्या प्राथमिक शाळा आणि महाविद्यालय इथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा व्यस्थापण करावे,शाळेतील सगळ्या शारिरीक शिक्षण वर्ग सुरु असताना मुलींना सक्षम व सुरक्षिता यांचे धडे व मार्गदर्शन नियमित करण्याचे सुचविले असून कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासने, शहरात दामिनी व निर्भया पथक सक्रिय करणे , या सगळया मागण्या साठी निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित पृथ्वीराज संजय ठाकुर ,मयूर पावडे ,विशाल सरोदे,अभिषेक गायकवाड ,अजय चवरे ,पंकज जिरवणकर, नागनाथ अण्णा तीलकरी ,विलास फुके हे सगळे तरूणानी उपस्थित राहून तहसीलदार, ठाणेदार, गट शिक्षण अधिकारि या सगळ्यांना तालुक्यात मुलींच्या सुरक्षे साठी यंत्रनेला अद्यावत करा असे निवेदन देण्यात आले.