रथोत्सवात धरणगावकरांचा जल्लोष ; व्यकट रमना गोविंदा गोविदा बालाजी जयघोष
प्रतिनिधी विनोद रोकडे
धरणगाव : येथील श्रीबालाजी भगवान रथोत्सवाची महापूजा व आरती होवून मोठया उत्साहात प्रारंभ झाला श्रीनारायण भक्तीपंथाचे मुख्य प्रवर्तक प पु लोकेशानंदजी महाराज, जळगाव लोकसभा खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, तहसीलदार महेद्र सुर्यवंशी, एक्साईज इन्स्पेक्टर श्री मोरे, सहायक निबंधक विशाल ठाकुर सो ,सी ए श्री भुषण मेहेर जगन्नाथ महाजन, नरेंद्र चंदेल, कृषी अधिकारी श्री देशमाने, नारायण भक्ती पंथाच्या विष्णु प्रियाजी, निकीताजी ,मातंग समाजाचे अध्यक्ष रामा चिंता-ता, मंडळाचे अध्यक्ष डी आर पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी श्री गणेश महाराज यांनी मंत्रोच्चाराने पूजा सांगीतली.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्याक्ष जीवनसिंग बयस, सेक्रेटरी प्रशांत वाणी, कोषाध्यक्ष किरण वाणी व मंडळाचे सर्व विश्वस्थ उपस्थित होते. सर्व प्रमुख मान्यवरांचा मंडळाच्या जेष्ठ विश्वस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने वाट चाल करावी, थांबला तो संपला ही ऊक्ती लक्षात ठेवावी. मंदिरे संस्कार व मनःशांतीचे प्रभावी केंद्र आहेत आपण सर्व भक्तांनी आपल्या बालाजी मंदिराच्या उभारणीसाठी केलेली सेवा आपल्याला नक्की समाधान देईल .श्रीबालाजी भगवानांची मुर्ती २०२५ मध्ये स्थानापन्न होईल व आपल्या सर्वांचे स्वप्न साकार होईल मंदीर पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावाच्या विकासात भर पडेल. श्रीविष्णुशक्ती खऱ्या अर्थाने करून प्रत्येकाने स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे, हीच खरी भक्ति आहे असे आर्शिवचन रुपाने श्री-लोकेशानंद गुरूजींनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डी. आर-पाटीक यांनी केले, सुत्रसंचालन सचिव प्रशांत वाणी तर आभार उपाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी मानले त्यावेळी ध्रृवसिंग बयस, भालचंद्र येवले,पंडित चौधरी, कालीदास पुराणिक, अॅड वसंतराव भोलाणे, भानुदास व्हावे, महेन्द्र बयस, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे जेष्ठ नेते श्री डी जी-पाटील, शिरीष बयस व भाविक मोठया प्रमाणावर उपस्थित होते. जळगाव जिल्हा पालकमंत्री ना श्री गुलाबराव पाटील यांनी उशीरा भेट देवून श्रीबालाजी भगवानांचे दर्शन घेतले व सर्व व्यायाम शाळांना भेटी देवून खेळाडुंना प्रोत्साहीत केले.