ताज्या बातम्या

गुलाबराव देवकरांचा मास्टर स्ट्रोक ; शिंदे गटाचा उप जिल्हाप्रमुखच फोडला !

कोळी समाजाच्या मतांवर पडणार प्रभाव !

जळगाव  :  जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे उर्फ नानाभाऊ, त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे जळगाव तालुका संघटक शुभम सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तशातच शिवसेना शिंदे गटाचे जळगाव उपजिल्हा प्रमुख तसेच दापोरा गावाचे माजी सरपंच नानाभाऊ सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत युवा सेनेचे जळगाव तालुका संघटक शुभम सोनवणे, दापोरा विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश आबा काळे आणि तेजस सोनवणे, नाना गवंदे, बाळुभाऊ सोनवणे, भावलाल सपकाळे, उत्तम सोनवणे, विठ्ठल साठे आदींनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची साथ देण्याचा निर्धार केला.

याप्रसंगी माजी मंत्री श्री.देवकर तसेच मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील, पाथरीचे माजी सरपंच संतोष नेटके तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नीलेश पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, दापोरा गावाचे वाल्मीक पाटील, तुकाराम तांदळे, पप्पू सोनवणे, मंगलसिंग सोनवणे उपस्थित होते.

कोळी समाजाच्या मतांवर पडणार प्रभाव !

नरेंद्र सोनवणे उर्फ नानाभाऊ यांच्या प्रवेशाने कोळी समाजाच्या मतांवर प्रभाव पडणार असून मताधिक्य असलेल्या कोळी समाजाच्या मतांचा फायदा हा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांना निश्चितच होणार आहे. प्रसंगी अजून ‘मोठे मासे गळाला लागणार’ असे सूचक वक्तव्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *