वंचितचे उमेदवार म्हणून विठ्ठल रबदाडे राहीले तर रासपचे आमदार गुट्टे यांचे समिकरण बिघडणार
गंगाखेड – 2019 मधिल विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याच्या प्रचारात अनेक दिग्गज नेते पाठिशी उभे .होते. आमदार रत्नाकर गुट्टे यांना विजयश्री खेचुन आणण्यात महादेव जानकर याच्याकडे श्रेय जाते. त्यानी धनगर, हटकर समाजचा रासप पक्षाकडे मोठ्या जनाधार असून गंगाखेड विधानसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते धनगर हटकर समाजाची आहेत. हे समीकरण पाहता धनगर हटकर समाजाचे नेते म्हणून विठ्ठलराव रबदाडे यांना पाहिले जाते. विठ्ठलराव रबदाडे हे वंचित बहुजन आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने धनगर, हटकर समाजाच्या मताचे विभाजन होणार, यात विद्यमान आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांची डोकेदुखी वाढणार पण मतांचे गणित ही बिघडणार हे मात्र निश्चित.
मराठा समाजाचा पाठोपाठ या विधानसभेमध्ये धनगर आणि हटकर समाजाची मोठ्या प्रमाणात मते असल्याने धनगर आणि हटकर समाजात विठ्ठल रबदडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वबळावर 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांची कोंडी होताना दिसत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर जर निवडणूक लढवीत असेतील तर भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार देणार हे निश्चित आहे. भाजपाचे उमेदवार म्हणून परळी वरून प्रीतमताई मुंडे गंगाखेड मधून भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व सुभाष कदम यांची नावे समोर येत आहेत .भाजपाने आपली पहिली यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये मेघनाताई बोर्डीकर या विद्यमान आमदार असल्याने त्यांची नावे जिंतूर मतदारसंघातून जाहीर करण्यात आली आहे. पण गंगाखेडचा यात समावेश नाही .भाजपासोबत युती करून रासपने निवडणूक लढवली तर आमदार गुट्टे यांना याचा फायदा मिळणार आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कार्यकर्त्यांना सोबत घेऊन थेट जनतेशी संपर्क ठेवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवून त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या गाठीभेटीवर मोठ्या प्रमाणात भर दिल्याचे पहावयास मिळते याचा फायदा काही प्रमाणात का होईना पण रत्नाकर गुट्टे यांना होण्याची शक्यता आहे.
मराठा ओबीसी आरक्षणावरून पेटलेल्या वाद याची ठिणगी मतदारसंघात दिसून येणार असल्याचेही बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गंगाखेड विधानसभ मतदार संघात उमेदवार दिला तर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी महायुतीत जागा वाटपाचा तीडा आणखी सुटला नाही.
मतदानाला फक्त एकच महिना शिल्लक असल्याने नवीन येणाऱ्या उमेदवाराला गंगाखेड विधानसभा मतदार संघ पिंजून काढणे शक्य होणार नाही.
2024 च्या निवडणुकीच्या आखाड्यात कोण कोण उमेदवार रिंगणात उतरणार याची उत्सुकता मतदाराला लागली आहे .
भारतीय जनता पार्टी कडुन संभाव्य उमेदवार म्हणून प्रीतम ताई गोपीनाथराव मुंडे ,संतोष मुरकुटे, सुभाष कदम यांची नावे समोर येत आहेत .उद्धव ठाकरे शिवसेना गटातून विशाल कदम, सिताराम घनदाट यांची नावे समोर येत, राष्ट्रीय समाज पक्षात आमदार रत्नाकर गुट्टे एक मात्र उमेदवार असतील.
वंचित बहुजन आघाडीत संभाव्य उमेदवारांमध्ये विठ्ठल रबदाडे ,सिताराम घनदाट, सुरेश फड यांच्या नावाची चर्चा आहे, सिताराम घनदाट यांचे उद्धव ठाकरे शिवसेना गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षाकडे नाव येत असल्याची चर्चा गंगाखेड शहरामध्ये चालू आहे.
2019 च्या गंगाखेड विधानसभेचे मतदान संख्या 3 लाख 89 हजार 421 होती आता 4 लाख 16 हजार 593 इतकी झाली आहे.
27 हजार 172 नवीन मतदाराचा यात समावेश झाला आहे. मागील निवडणुकीत आमदार रत्नाकर गुट्टे यांना 81569 मते मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे विशाल कदम यांना 63 हजार 111 मते मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर ची मते सिताराम घनदाट यांना 52 हजार 287 इतकी मिळाली होती 18058 मताच्या फरकाने आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला होता. पण आताची परिस्थिती वेगळी आहे ओबीसी व मराठा ,शिवसेनेत दोन गट, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट, भाजपा रासपा असे दोन गट निर्माण झाल्याने आता निवडणुकीत उमेदवारांच्या विजयाची गणिताचा अंदाज व्यक्त करता येणार नाही.
गंगाखेड विधानसभेची जनता ही धनशक्तीच्या जोरावर मतदान करते की? आपापल्या जातीचे समीकरण लावते? का विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मतदान करते हे आता येणाऱ्या 23 नोव्हेंबरला कळणार आहे.
घोडा और मैदान सामने है |