ताज्या बातम्या

जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीत २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतलेअर्ज

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे

जळगाव जिल्ह्यात निवडणूकीची रणधुमाळीला सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे. अशी माहिती धरणगाव निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. यात पालकमंत्री गुलाराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे.

जळगाव ग्रामीण विधान सभेच्या निवडणूकीसाठी मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत निवडणूक कार्यालयात इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज विकत घेण्यास सुरूवात केली आहे. यात पहिल्यांच दिवशी पहिला अर्ज शिंदे गटातर्फे गुलाबराव पाटील -१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर-२, विशाल देवकर-२, अपक्ष प्रसाद लिलाधर तायडे-१, शिवाजी पथरू हटकर-१, राहूल लालसिंग राजपूत-१, उन्मेश राजेश वाडेकर-१, साधना निलेश पाटील-१, सोनी संतोष नेटके-१, अनिल मोहन पवार-१, जितेंद्र पांडूरंग पाटील-१, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे-१, ठाकरे गटातर्फे निलेश सुरेश चौधरी-१, ठाकरे गटातर्फे भागवत धनसिंग धनगर-२, भरत देवचंद पाटील-२, भिका परबत राजपूत -१ असे एकुण २० जणांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *