ताज्या बातम्या

सालदार झाला मालदार ; गुलाबराव पाटील यांच्या संपत्तीत इतक्या पटीने झाली वाढ !

धरणगांव – जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटील यांनी जळगांव ग्रामीण मधून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेचा सर्व तपशील सादर केला आहे. गुलाबरावांची नेमकी संपत्ती किती ? गेल्या पाच वर्षात गुलाबराव यांच्या संपत्तीत किती पटीने वाढ झाली आणि त्यांच्याकडे किती सोनं आहे ?

शिंदे गटाच्या वतीने गुलाबराव पाटलांनी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात गुलाबरावांची संपत्ती लाखांमधून कोटीत पोहोचली आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर तसेच शिंदे गटावर “ ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला. आणि “ ५० खोके, एकदम ओके ” ही घोषणाच प्रचलित झाली. या खोक्यांच्या आरोपा नंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची आजची संपत्ति काय आहे ? ते आपण पाहणार आहोत.

गुलाबराव पाटील यांनी २०१९ – २० या वर्षात जवळपास २६ लाख रुपये उत्पन्न दाखविले आहे तेच पाचव्या वर्षी म्हणजेच २०२३ – २४ या वर्षात जवळपास एक कोटी ७३ लाख रुपये दाखविले आहे.

त्यांच्या पत्नी देखील इन्कम टॅक्स भरत असून त्यांचे उत्पन्न २०१९ – २० या वर्षात जवळपास सव्वा दोन लाख असून तेच पाचव्या वर्षी म्हणजेच २०२३ – २४ या वर्षात ७ लाख रुपये झाले आहे.

त्यांच्यावर कोणताही खटला अथवा गुन्हा नसल्याचे नमूद केले आहे.

त्यांच्या हातात रोख रक्कम २ लाख ७३ हजार तर त्यांच्या पत्नीकडे १ लाख २३ हजार रुपये रोख रक्कम आहे.

मंत्री पाटील यांच्या जे डी सी सी बँकेच्या खात्यात १ लाख ४० हजार, सेंट्रल बँकेच्या खात्यात ३४ लाख २० हजार तर स्टेट बँकेत ३ लाखाची रक्कम आहे. त्यांच्या पत्नीच्या जे डी सी सी बँकेच्या खात्यात ४७ हजार तर कोटक महिंद्रा बँकेत ३ लाख ८४ हजार रुपये आहेत.

त्यांनी केलेली गुंतवणूक तसेच ते कुठे कुठे भागीदार आहेत ते पाहुयात –

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील एस. के. एन्टरप्रायजेस, सावदा येथील सप्तशृंगी जिनिंग, जी. ब्रम्हाजी होमटेक्स, तसेच विजय रामणारायण झवर, विलास नारायण चौधरी, साधना विजय झवर, प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, चौधरी टोयाटो यांच्याशी त्यांनी व्यवहार केले आहेत. आणि जी. ई. पी. एल., ऐक्युरेसी सिप, जैन एरिगेशन, रतन इंडिया पावर, रिलायन्स पावर, सविता ऑइल, सोम डिस्टिलरी, एस बँक यात त्यांची गुंतवणूक आहे.

त्यांच्या कडे टोयोटा कंपनीची फोरच्युनर, असून त्यांच्याकडे १४० ग्रॅम सोने तर पत्नी कडे १५० ग्रॅम सोने आहे. तसेच हॉटेल भाऊ या हॉटेलात त्यांची गुंतवणूक आहे.

गुलबरावांच्या मालमत्तेचा तपशील पाहुयात –

गुलबरावांच्या नावे ५ लाख ५० हजार रुपयाची पाळधी खुर्द येथे शेती तर त्यांच्या पत्नीच्या नावे ८ लाखाची शेती

पाळधी बुद्रुक येथे १० लाख ५० हजार रुपये किमतीची शेती तर पत्नीच्या नावे एकलग्न येथे १२ लाख रुपये किमतीची शेती

लाडली येथे त्यांच्या नावे ८ लाख ७५ हजार रुपयाची, चांदसर बुद्रुक येथे गट क्रमांक ५९० ही ११ लाखाची, तर गट क्रमांक ५९३ ही ५ लाखाची, पत्नीच्या नावे पाळधी बुद्रुक येथे ५ लाख ७५ हजार रुपयाची, लाडली येथे ५ लाख ४० हजाराची शेती आहे.

गुलाबराव यांच्या नावे ६४ लाखाची पाळधी बुद्रुक येथे मालमत्ता, पाळधी बुद्रुक येथे १० लाख ५० हजाराचा प्लॉट, आव्हानी येथे साधारण ३५ हजार स्क्वेअर फुट प्लॉट, पाळधी बुद्रुक येथे ६० लाखाची वाणिज्यिक इमारत, अंधेरी येथे एक कोटी ५४ लाखाचे घर, ठाण्यात एक कोटी २१ लाखाचा फ्लॅट, मरीन पॅलेस येथे ८० लाखाचा प्लॉट, अशी एकूण जवळपास ६ कोटीची प्रॉपर्टी सध्याच्या परिस्थितीत गुलाबरावांनी दाखविली आहे. तसेच ठाण्यात फ्लॅट घेण्यासाठी एकास ६० लाख रुपये अॅडव्हान्स दिले आहेत.

खडके नामक व्यक्तीस २८ लाख दिले असून ३४ लाखाचे घराचे कर्ज व ४६ लाखाचे गाडीचे कर्ज त्यांच्यावर आहे.

अश्या प्रकारे एकूणच त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांच्यावर विरोधक ‘ सालदार, मालदार ” झाल्याची टिका करीत आहेत. गुलाबराव पाटलांच्या एकूण संपत्ती बाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेल ला सब स्क्राईब करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *