ताज्या बातम्या

भाजपचे बंडखोर अमोल शिंदेंना वरिष्ठांचे अभय ? किशोर आप्पांची अडचण !

पाचोरा प्रतिनिधि – अमिन पिंजारी

पाचोरा – भडगांव मतदार संघात चुरशीची लढत पहायला मिळत आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोके दुखी वाढली आहे. या मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणुन शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे मैदानात आहेत. तर या ठिकाणी भाजपचे अमोल शिंदे यांनी बंडखोरी करीत ते अपक्ष निवडणुक लढवित आहेत. यातच भाजपने नुकतेच राज्यातील भाजपच्या ४० बंडखोरांवर ६ वर्षासाठी हकालपट्टीची कारवाई केली आहे. मात्र या यादीत भाजपचे पाचोरा भडगांव मतदार संघातील बंडखोर अमोल शिंदे यांचे नाव नसल्याने भाजपचे बंडखोर अमोल शिंदेंना वरिष्ठांचे अभय आहे का ? अशी चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे. मात्र यामुळे मतदार संघात किशोर आप्पांची अडचण निर्माण झाली आहे.

यांची केली भाजपमधून हकालपट्टी

धुळे ग्रामीण – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील, जळगाव शहर – मयूर कापसे, अश्विन सोनवणे, अकोट गजानन महाले, वाशिम – नागेश घोपे, बडनेरा तुषार भारतीय, अमरावती – जगदीश गुप्ता, अचलपूर प्रमोद गड्रेल, साकोली – सोमदत्त करंजेकर, आमगाव – शंकर मडावी, चंद्रपूर ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी – वसंत वरजूरकर, वरोरा – राजू गायकवाड, अतेशाम अली, उमरखेड भाविक भगत, नटवरलाल उंटवल, नांदेड उत्तर – वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, नांदेड दक्षिण – दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, घनसावंगी – सतीश घाटगे, जालना अशोक पांगारकर, गंगापूर – सुरेश सोनावणे, वैजापूर एकनाथ जाधव, मालेगाव बाह्य – कुणाल सूर्यवंशी, बागलाण आकाशसाळुंखे, जयश्री गरुड, नालासोपारा हरीश भगत, भिवंडी ग्रामीण – स्नेहा पाटील, कल्याण पश्चिम- वरुण पाटील, मागाठणे – गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी पूर्व धर्मेंद्र ठाकूर, अलिबाग – दिलीप भोईर, नेवासा बाळासाहेब मुरकुटे, सोलापूर शहर उत्तर – शोभा बनशेट्टी, अक्कलकोट – सुनील बंडगर, श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते, सावंतवाडी – विशाल परब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *