ताज्या बातम्या

बारी समाजाच्या २५० उपवधू वरांनी दिला परिचय ; समाज बांधवानी घेतली १०० टक्के मतदानाची शपथ

जळगांव – नागवेल प्रतिष्ठान आयोजीत प्रसंगी स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी : नागवेल प्रतिष्ठान तर्फे बारी समाजाच्या उपवधु उपवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी १२९उप वधू तर १२१ उपवर यांनी परिचय करुन दिला. कार्यक्रमाची सुरूवात संत रुपलाल महाराज प्रतीमा पुजन व प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नागवेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन बारी, नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष लतीश बारी, सामाजिक कार्यकर्ते अमृत खलसे ,यशवंत बनसोडे, प्रा ईश्वर धामणे, विठ्ठल फासे ,माजी नगरसेविका शोभाताई बारी, राहुल अस्वार ,वर्षा रोकडे , महानगरपालिका अग्निशमन अधीकारी शशिकांत बारी, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष अरूण बारी,विजय बारी,भरत बारी, शरद वराडे, बंटी लावणे,अतुल बारी, नितीन बारी, सी ए राहूल पाटील, राजेंद्र बारी, सागर बारी, महेंद्र बारी, योगेश बारी,भूषण बारी, रमेश डबे,बालमुकुंद बारी उपस्थित होते.

नागवेल प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी वधु वर परिचय मेळाव्याचे गेल्या १३ वर्षापासून आयोजन केले जाते. त्यामुळे लग्न जुळण्यास मदत होते. यंदा १२९ उपवधू तर १२१ उपवर यांनी आपला परिचय करून दिला. समाज बांधवानी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते नागवेल वधु वर परिचय स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मध्य प्रदेश ,गुजरात व महाराष्ट्रातून बारी समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते. मनोगत लतीश बारी ,व्यक्त केले. तर सूत्रसंचालन दत्तात्रय बारी, यांनी केले. तर प्रकाश रोकडे यांनी आभार मानले. श्रीकांत बारी नरेंद्र बारी कैलास बारी नाना काटोले पवन बारी प्राध्यापक अनिल बारी मयूर बारी सुशील बारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *