ताज्या बातम्या

वंचित आणि मराठा मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता! पैशाचा उंदीर मधल्या मधे पोखरतो आहे का?

गंगाखेड प्रतिनिधि / गुणवंत कांबळे

लोकसभेत मराठा योध्दा जरांगे पाटील यांचा आदेश शिरसावंदे मानुन महाविकास आघाडीच्या जागा मताधिक्याने निवडून आणण्यात यश मिळाले. त्याप्रमाणे विधानसभेत जरांगे फॅक्टर चालेल असे वाटत नाही स्थानिक नेत्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली काही पुढारी अडकल्याने त्यांना त्या नेत्याला सोडून जाता येत नाही तर काही पुढारी व सामान्य कार्यकर्ते यांना पैशाचे आम्हीच दाखवून विकत घेण्याची काम सध्या चालू आहे. परंतु त्यामध्येही स्वाभिमानाची मराठा आरक्षणाची लढाई लढणारे काही कार्यकर्ते आहेत ते विकल्या जाणार नाहीत. मराठा समाजाचे एक गठ्ठा मतदान एक उमेदवाराला पडेल असे सध्या तरी वाटत नाही. गंगाखेड विधानसभेमध्ये पैशाचा जो उंदीर फिरतो आहे तो वंचित आणि मराठा समाजाचा मताचा मधला भाग पोखरा करण्याचे काम सध्या चालू आहे आसे दिसते आहे.
वंचितची स्थिती याच प्रमाणे आहे.वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रचारापासून वंचित असल्याचे चित्र पहावयास मिळाले म्हणजे वंचितचे जे उमेदवार आहेत ते पदाधिकाऱ्यांना विचारात घेताना दिसत नाहीत. त्यामुळे काही पदाधिकारी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देत रासपामध्ये प्रवेश करून प्रचारात अग्रेसर भूमिका घेतली आहे. बहुजन समाजात मतदान करून घेण्यासाठी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब चालू असल्याचे दिसून येत आहे. समाजाचा पुढारी मोरक्या म्हणून घेणारा आज ठेकेदाराची भूमिका बजावताना दिसत आहे. पुढारी ठेकेदार झाले तरी पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जुडले गेलेली माणसे आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार एकनिष्ठ ने समोर घेऊन जाणाऱ्या निष्ठावान कार्यकर्ते गाव गाड्यावर असल्याचे दिसून येत आहे. जो की या ठेकेदाराकडून विकल्या जाणार नाहीत. स्वाभिमानाने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा कार्यकर्त्याच्या खांद्यावर घेऊन समता, स्वतंत्र, बंधुत्व विचार समोर घेऊन जाण्याचे काम करत आहेत.
मुस्लिम, धनगर, हटकर व इतर समाजात देखील याच प्रमाणे ठेकेदारी पद्धत चालू असून पाठिंबाच्या स्वरूपामध्ये मत विभागणी चालू आहे. प्रत्येक समाजाचे अशा प्रकारे स्थिती असल्याने मते विभागली जाण्याची शक्यता आहे.
गंगाखेड मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ओबीसी व मित्र पक्षाचे उमेदवार विठ्ठलराव रबदाडे ,महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे, शिवसेना उबाठा गटाचे विशाल कदम वंचित बहुजन आघाडीचे सिताराम घनदाट या चार उमेदवारामध्येच सरळ लढत होताना दिसत आहे. चौरंगी लढतीत विजय कोणाचा निश्चित होईल हे अद्याप सांगता येणार नाही .
समाजात राजकारणाच्या माध्यमातून दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे विकासात्मक दृष्टिकोन बाजूला सारून जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे हे जातीपातीचे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे .समाजात जनजागृती झाली पाहिजे हा देश विकसित देश झाला पाहिजे असे ठरवूनच
मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे . अन्यथा धर्मा- धर्मात,जाती- जातीत, भांडणं तंटे होण्यास वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *