ताज्या बातम्या

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत ; पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक

जळगाव दि.२५ प्रतिनिधी – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे गुजरातचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख संजीब कुमार बेहरा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते.निरमा विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. करसन पटेल यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट” आणि क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड” सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून पालवी सध्या गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. जैन इरिगेशच्या कलाविभागातील विजय जैन व सौ. नीलिमा जैन यांची पालवी कन्या असून तिच्यासह पालकांचेह कौतूक होत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुक करून तिच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *