लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय युवतीवर अत्याचार ; चोपडा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका गावातील (२१) वर्षीय युतीवर अत्याचार केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठण्यात आशिष समाधान सपकाळे वय (२२) वर्ष रा. चहार्डी ता. चोपडा , प्रशांत पाटील (वय २३) वर्ष अंदाजे रा. शिरपुर जवळ पुर्ण पत्ता माहीत नाही समाधान भाईदास सपकाळे (वय ५०) वर्ष रा. चहार्डी ता. चोपडा रविंद्र निंबा कोळी (वय ३६ वर्ष) रा. अकुलखेडा ता. चोपडा अलकाबाई समाधान सपकाळे (वय ४५ ) वर्ष रा. चहार्डी ता. चोपडा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि २१/१०/२०२२ रोजी सकाळी ०९:३० ते १०:०० वा च्या सुमारास आशिष सपकाळे याने फिर्यादी हिच्याशी ०३ वर्ष प्रेम संबंध ठेवुन तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून दि. २१/१०/२०२२ रोजी सकाळी ०९:३० ते १०:०० वा च्या सुमारास चोपडा ते अडावद जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या केळीच्या शेतात फिर्यादीची संमती नसताना तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने जबरी अत्याचार केला व दि.२३ /०१/२०२३ रोजी सुदर्शन हॉटेल वरील लॉज, शिरपुर बस स्टॅन्डजवळ ता.शिरपुर जि. धुळे येथे आरोपी प्रशांत पाटील याने फिर्यादीस धमकी देवून तुझा अश्लिल व्हिडीओ मी पाहीलेला असून तो व्हीडीओ आरोपी हा व्हायरल करणार आहे म्हणून तुला शिरपुर येथील सुदर्शन हॉटेलच्या लॉजवर यावच लागेल त्याठिकाणी माझी ओळख आहे असे म्हणून आरोपीस मदत केले त्यानंतर आरोपी अलकाबाई सपकाळे हिला पिडीतेने तिच्या सोबत झालेल्या घडलेल्या प्रकार बद्दल सांगितले असता तिने उलट फिर्यादी हिला शिवीगाळ करून तू तुला समजत नाही का असे बोलून वाद केला तसेच आरोपी क्र ०३ आणि ०४ यांनी फिर्यादीस दि.२८/०२/२०२३ रोजी सकाळी ०८:३० वा च्या दरम्यान अकुलखेडा गावाच्या पुढे असलेल्या संकेत हॉटेलच्या लॉजवर बोलवुन तेथे आरोपी रवींद्र कोळी व समाधान सपकाळे आणि यांच्याशी शाब्दीक वाद होवुन व पिडीतेस आरोपी आशिष सपकाळे सोबत लॉजच्या रुममध्ये ढकलुन आरोपी सांगितले की पिडीते जवळचा मोबाईल घेवून त्यात असलेले आरोपीचे व फिर्यादीचे सोबत असलेले फोटो व कॉल रेकॉर्डिंग डिलीट करण्याचे सांगून त्यास सहाय्य केले व त्यावेळेस देखीलआरोपीने पिडीतेवर तिच्या ईच्छेविरुध्द जबरदस्तीने अत्याचार केले. पिडितेस आरोपी समाधान भाईदास सपकाळे आणि आरोपी रवींद्र कोळी हे तिला म्हणाले की आरोपी आशिष समाधान सपकाळे तुझ्याशी लग्न करणार आहे त्यामुळे तु थोडे दिवस थांब असे बोलुन त्यानंतर पिडितेने आरोपीना लग्नाबाबत फोन केला असता त्यावेळेस आरोपी आशिष सपकाळे हा पिडीतेस बोलला की तु घरातील लोकांना फोन करु नको तु जर परत त्यांना फोन केला तर मी तुझा व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली म्हणून भा.द.वी. कलम 376(1),354,(5),109,504,506,34 प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि/योगेश्वर हिरे चोपडा शहर पोस्टे हे करीत आहेत.