ताज्या बातम्या

गृहरक्षक दल 78 वा होमगार्ड वर्धापनदिन साजरा

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

आज दि 08/12/2024 रोजी 6 डिसेंबर1946 साली गृहरक्षक दल होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्या निमित्ताने श्री अशोक नखाते जिल्हा समादेशक होमगार्डस् तथा अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या आदेशानुसार पथकातील तालुका समादेशक अधिकारी श्री ईश्वर सखाराम महाजन यांच्या मार्गदर्शन खाली होमगार्ड पथक धरणगांव कडून इंदिरा कन्या महाविद्यालय पासून ते शहरातील मुख्य रस्त्यावर बॅन्ड पथक द्वारे परेड पथ संचलन तसेच श्री छञपती शिवाजी महाराज स्मारक क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले स्मारक, घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांना माल्यार्पण व परिसरातील स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच होमगार्ड जवाना त्यांचे कर्तव्य व उद्देश विमोचन,अग्निशमन,बचावकार्य अणी संघटने बाबत माहिती देण्यात आली या प्रसंगी पथकातील पलटण नायक श्री ईश्वर शांताराम पाटील लिपिक जानकीराम पाटील अनिल सातपूते निखिल चौधरी भगवान महाजन अनिल महाजन ईश्वर चौधरी बॅण्ड पथक आत्माराम चौधरी गिरधर महाजन भिकन लोहार समाधान सोनवणे प्रशांत सोनवणे महिला होमगार्ड लताबाई वाणी रेखा चौधरी असे पथकातील अनेक होमगार्ड उपस्थित होते व शहरातील नागरिकांकडून कार्यक्रमाचे कौतुक व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *