ताज्या बातम्या

कजगांव येथे शॉर्टसर्किट मुळे दोन दुकानांना आग लागून लाखोचे नुकसान

भडगांव प्रतीनिधी: अमीन पिंजारी कजगाव

  • कजगाव ता.भडगाव येथील कजगाव भडगाव मार्गावरील स्वामी हटके वडा अँड अमृततुल्य व स्वामी जीन्स कॉर्नर या दोन दुकानास शॉर्ट सर्किटमुळे आग लागुन यात तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान झाले
    येथील कजगाव भडगाव मार्गावरील रणजित पाटील यांच्या मालकीचे स्वामी हटके वडा अँड अमृततुल्य प्रशांत पाटील यांच्या मालकीचे स्वामी जीन्स कॉर्नर या दोन दुकानास दि.११ रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने यातील स्वामी हटके वडा अँड अमृततुल्य हि दुकान जळून खाक झाली शेजारीच असलेल्या स्वामी जीन्स कॉर्नर या दुकानातील मोठ्या प्रमाणात रेडीमेड कापड सह फर्निचर जळाल्याने या दुकानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दोघं दुकानाचे अंदाजे तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान झाले वेळीच ग्रामस्थ धाऊन आल्याने पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आली प्रसंगी मोठी गर्दी जमली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *