ताज्या बातम्या

बंद करा बंद करा आता बाल विवाह बंद करा ! बाल विवाह रोखथाम चळवळ ; बाल विवाह प्रतिबन्ध पोस्टर चे विमोचन

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

धरणगांव : कार्यालय,पंचायत समिति, आरोग्य विभाग, NGOs फॉरम व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरानगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बाल विवाह रोखथाम चळवळ सुरू करण्यात आली. जिल्हाअधिकारी मा. श्री.आयुष प्रसाद व मा. श्री. मनीष कुमार गायकवाड (प्रान्त) उपविभागीय दंडाधिकारी हांच्या आदेशानुसार मा. श्री. अजित सिंग पवार, गट विकास अधिकारी धरणगांव यांच्या हस्ते बाल विवाह रोखथाम अभियानाचे उदघाटन करण्यात आले.

बाल विवाह प्रतिबंध कायदा -2006 ची चळवळ या बाल विवाह थांबविणे करीता शासन आपले काम करीत आहे. गावतील लोकानी, ग्राम पंचायत इतर सर्वानी एकत्र यावे व मिळून पूर्ण गावाचे विकास करावे गावाच्या विकासमध्ये लोकानी आपली जवाबदारी पार पाडावी. जसे ग्राम सभा मध्ये जाणे व गावाचा विकाससाठी एक मतानी पुढे येणे व शिक्षण, आरोग्य, जीवन शैली ह्या सारख्या गरजा कड़े लक्ष देणे. जन जागृती निर्माण करने व त्वरित टोल फ्री 1098 वर कॉल करने असे मार्गदर्शन केले.

त्याच प्रमाणे श्री. जितेन्द्र गोरे, प्रकल्प अधिकारी वर्ल्ड इंडिया धरनगांव यांनी बाल विवाह प्रतिबन्ध कायदा 2006 चे पालन कसे करता येईल व कोणतेही मुले हे बाल विवाहला बळी पड़ल्यास कोणती तरतूद करावी व 1098 आणि 112 हेल्पलाइन वर कॉल करने व गावात काहीही वाटपचा कार्यक्रम असल्यास सर्व लोक येतात. तसेच समाजातील बाल विवाह सारख्या सामाजिक समस्या सोडावीन्या करीता सर्वानी एक विचारने, एक मताने व एक आत्म्यांने पुढे येणे व बाल विवाह प्रतिबध चे पालन करने असे आपल्या भाषाणाचा माध्यमाने मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व सहभागीना हिम्मत दिली.

गुड़ टच ब्याड टच बाबत डॉ.संजय चौहान, तालुका धरणगांव यानी मार्गदर्शन केले व शासनाची योजना किशोरी बालिकासाठी सौ.रेखा तायडे, महिला व बाल विकास प्रकल्प ह्यानी सांगितले की, आपण ज्या प्रमाणे वर्ल्ड व्हीजन इंडिया प्रामाणिकपने आंगनवाड़ी व गावात खालच्या पातळी वरुण वरच्या पातळीत काम करत आहे तसे सर्व NGO ने सुध्या केले व गावतिल किशोरी बालिका वर जास्त लक्ष दिले पाहिजेत. त्याच प्रणाने आरोग्य विभागतून मा.श्री.ज्ञानेश्वर शिम्पी व समस्त टीम यांनी सुद्धा बाल विवाह चे होणारे वाइट परिणाम बाबत सांगितले. “इवाक कॅम्पियान चे उद्घाटन करण्यात आले.

वर्ल्ड व्हीज़न इंडिया च्या माध्यमाने शपथ विधि घेण्यात आली शेवटी हस्ताकक्षर अभियान राबविण्यात आले व उपस्थित सर्व लोकानी हस्ताकक्षर करुंन वचन दिले व वर्ल्ड व्हीजन इंडिया च्या माध्यमाने प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबन्ध पोस्टर व चाइल्ड हेल्पलाइन चे स्टीकर वाटण्यात आले. कार्यक्रमात धरनगांव तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य विभागची पूर्ण टीम, जळगातील NGO फॉरम चे टीम सौ.रेणुका जी, आधार बहूउदेशीय संस्था-अमळनेर, श्री.महेश.पी.शिरशाठ, डॉ. बाबासाहेब बहूउदेशीय सस्था चोपड़ा, श्री.निलेश शिंदे व टीम- जन साहस सस्था, श्री. चौहान, बहूउदेशीय आदिवासी सेवा सस्था, श्री.संजय पाटिल व टीम दिव्यांग सस्था, वर्ल्ड व्हीज़न इंडिया चे समस्त टीम व श्री.विकास पाटिल, ग्राम सदस्य वराड, फूलपाट सरपंच विमल बाई भील, सरपंच टहाकळी -सुरेश कोळी, शाळा समिति अध्यक्ष -नारायण पाटिल टहकाळी, श्री. महेश महाराज-एकलग्न धरनगांव तालुक्यातील आशा संयोगनी, आंगनवाड़ी सेविका, ग्राम पंचायत चे सभासद, ब्लॉक स्तर बाल समूह, ब्लॉक स्तर बाल सुरक्षा समिति व सुपरवाइजर मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *