ताज्या बातम्या

चोपडा फार्मसी येथे वाचन संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांची सुरवात….

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा येथील श्री महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात वाचन संकल्प अभियानाची सुरवात दि ३०/१२/२०२४ पासून करण्यात आली. सदर उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आदेशानुसार राबविण्यात आला. सदर अभियानाची सुरवात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांनच्या हातून फीत कापून करण्यात आली. उदघाटन समारंभाचे अध्यक्ष डी. फार्मसी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. पियुष चव्हाण होते.अभियानाची सुरवात ग्रंथ प्रदर्शनाने झाली सदर प्रदर्शनाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी भेट दिली व उपयुक्त पुस्तकांची माहिती ग्रंथालयातील सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. अभियानाच्या दुसऱ्या सत्रात वाचन कौशल्य या विषयावर प्रा डॉ संदीप पवार यांनी मार्गदर्शन केले व वाचनात रुची वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले.अभियानात ग्रंथालयातील ई संसाधनावर कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रा शी नितीन बारी, प्रा सौ रेखा माळी, मदतनीस मो हारून व श्री शैलेश चौधरी यांनी केले आहे. सदर कार्यक्रमला प्रा. डॉ. भारत जैन प्रा डॉ मो रागीब, प्रा सौं नलिनी मोरे, प्रा श्री कुंदन पाटील, प्रा डॉ सुवर्णालता महाजन प्रा.डॉ. प्रेरणा महाजन प्रा. डॉ.रुपाली पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला अड. भैयासाहेब संदीप सुरेश पाटील सचिव सौ. डॉ. स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रबंधक प्रफुल्ल मोरे सर विभागप्रमुख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *