पाथरी शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा !
शाळा परिसरात छेडछाड प्रतिबंधक पथक निर्माण करण्याची मागणी ; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा!
पाथरी प्रतिनिधी/उध्दव इंगळे
पाथरी शहरात व तालुक्यातील चालणारे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत यासाठी युवा सेनेच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन देण्यात आले. पाथरी शहर व तालुक्यात सुरू असलेली हातभट्टी दारू , शहरात जुनी पाण्याची टाकी, नविन आठवडी बाजार परिसरात सर्रास चालणारी गांजा तस्करी त्यामुळे तरुणांमध्ये गांजा तसेच व्हाइटनर चे नशा करण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शाळा परिसरात मुलींना छेडण्याचे प्रकार घडत असुन मुलींची छेडछाड तात्काळ थांबवावी व छेडछाड पथक स्थापन करण्यात यावे.
तालुक्यात अवैध वाळू उपसा करून वाळु विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे शासनाचा महसुल बुडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या सर्व अवैध धंद्यामुळे पाथरी शहर व तालुक्यातील वातावरण दुषीत झाले असुन यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल भाले पाटील यांच्या कडून देण्यात आला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल भालेपाटील, उपजिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ साखरे पाटील, ताजू बाबा फारोकी,प्रताप शिंदे, उत्तमराव झिंजुर्डे ,युवा सेना उपतालुकाप्रमुख नारायणजी दळवी यावेळी उपस्थित होते.