ताज्या बातम्या

यशवंत पाटील यांना सामाजिक कार्यभूषण पुरस्कार

धरणगाव, प्रतिनिधी अजय बाविस्कर

एरंडोल – तालुक्यातील तळई गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा कृतिशील युवक यशवंत खुशाल पाटील यांना सामाजिक कार्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तळई गावात बहुजन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गावातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन वैचारिक प्रबोधन करून जयंती उत्सव साजरा करणे, विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा तसेच जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करणे इ. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ज्यांचा महत्वाचा सहभाग असतो असे गावातील हरहुन्नरी युवक यशवंत खुशाल पाटील यांना छत्रपती संभाजीराजे बालसंस्कार केंद्र व वैचारिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने “सामाजिक कार्यभूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रमुख अतिथी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज पुष्कर महाराज गोसावी, कार्यक्रमाचे अध्यक्ष अंजनी धरणाचे शिल्पकार तथा माजी आमदार महेंद्रसिंग पाटील तसेच नारपार योजनेचे शिल्पकार एडव्होकेट भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यशवंत पाटील यांनी या पुरस्काराचे श्रेय देतांना असे म्हटले की, तळई गावाचे आराध्य दैवत श्री. सद्गुरू गोविंद महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच समस्त ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या अनमोल सहकार्यामुळे हा सन्मान मिळाला असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *