ताज्या बातम्या

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील

आज दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय रुग्णालय चोपडा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शासकीय रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील आयोजन करताना स्टेट बँक ऑफ इंडिया ला 70 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एकूण 71 रक्त दात्यांनी समाजाचे देणे लागतो हा उद्देश ठेवून चोपडा शहरातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी करून दिले.. रक्तदान शिबिराला स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक श्री.धर्मेंद्र कुमार व श्री. प्रकाश बिशवाल श्री. आशिष जाधव व प्रशासनिक कार्यालय जळगाव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. गजानन पाटील,श्री. संकेत खोडवे,श्री.विशाल तांगडे,श्री. वाल्मीक बागुल , श्री. रवी हरणे आणि इतर कर्मचारी व अधिकारी चोपडा यांनी परिश्रम घेतले. चोपडा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री. सुरेश पाटील,श्री दीपक पगारे व इतर सर्व कर्मचारी बांधव यांनी रक्तदान शिबिर आयोजन करण्यासाठी मेहनत घेऊन शिबिर आयोजित करण्यात अनमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *