धरणगावात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

धरणगाव (प्रतिनिधी) विनोद रोकडे
:येथील मोठा माळीवाडा परिसरातील रहिवासी रोशन धनराज माळी (वय ३०) या तरुणाने आपल्या स्वतः च्या शेतात निंबाच्या झाडाला दोर लावून गळफास घेतलेले दिसून आले. या संदर्भात धनराज काशिनाथ माळी, उमेश काशिनाथ माळी, वासुदेव हरी माळी, नितेश वासुदेव माळी सर्व राहणार धरणगाव या नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना फोन दारे माहिती दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव पोलीस स्टेशनला रविंद्र हरी वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा घराशेजारी राहणारा त्यांचा पुतण्या रोशन धनराज माळी वय- ३१ वर्ष याने दिनांक १५/६/२५ रोजी सकाळी ७वा. चे सुमारास त्याचा स्वताचा शेतात निंबाचा झाडाला दोरी बांधुन गळफास घेतलेला आहे असा निरोप सांगितला. हे ऐकून ते तसेच धनराज काशिनाथ माळी, उमेश काशिनाथ माळी वासुदेव, हरी माळी, नितेश वासुदेव माळी सर्व लागलीच घटनास्थळी गेले. तेथून पोलीसांना फोनव्दारे माहीती देवुन मयत रोशन धनराज माळी यास ग्रामीण रुग्णालय येथे आणले. पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत. रोशन माळी याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.