ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना दैवत मानून गुणवत्तेसाठी कटिबद्ध असणारे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे

राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचा मराठवाडा भूषण 2025 हा पुरस्कार प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे मिळाल्याबद्धल श्री.योगेश गुंजकर या विद्यार्थ्याने लिहिला डॉ.चंद्रसेन कोठावळे यांना अभिनंदनपर लेख 

आतापर्यंत अनेक प्राचार्यांनी आपल्या
कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करून दिली आहे. साधारणपणे समाजात प्राचार्य शब्दाची विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मंडळींना फार भीती व तितकाच आदरही असतो. प्राचार्य हे पद प्रतिष्ठेसह अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे ही तेवढेच आहे. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी,संस्थेचे अध्यक्ष,सदस्य, विद्यापीठ प्रशासन आणि शासन या सर्वांशी ताळमेळ घालणारा व्यक्ती म्हणजेच प्राचार्य असतो.
कॉलेज, व्हिलेज आणि नॉलेज या सर्वांची सांगड घालून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उत्तरोत्तर पुढे नेणारा व्यक्ती म्हणजेच प्राचार्य होय.
या पदावर कार्यरत असणारी व्यक्ती जर सर्वगुणसंपन्न असेल तर निश्चितच महाविद्यालयाचे नावलौकिक होते.
ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न राहता त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भविष्य आणि आयुष्य उज्वल करावे असे प्रत्येक शिक्षकांना आणि प्राचार्यांना वाटते .
आतापर्यंत अनेक प्राचार्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आपली ओळख करून दिलेली आहे. त्यापैकीच ग्रामीण भागातील शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड ता. पैठण जि.छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे सर हे आहेत. संत एकनाथांची भूमी असलेल्या पैठण व परिसरात मात्र शैक्षणिक बाबतीत मागासलेपण म्हणावे लागेल. गोरगरीब,अनाथ, अपंग, निराधार, एकटे, परके, शोषित, पीडित या लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा जाऊन त्यांच आयुष्य आणि भविष्य उज्वल व्हावं अशी तळमळ मनाशी बाळगून प्राचार्य डॉ. कोठावळे सर अहोरात्र मेहनत करतात.
फेब्रुवारी २०२२ मध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.चंद्रसेन कोठावळे सर यांची नियुक्ती झाली.
आणि इथूनच ठिणगी पडली महाविद्यालयाच्या विकासाच्या कायापालटाची. प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे सर या पदावर रुजू झाल्याने महाविद्यालयाच्या पाचोड पैठण परिसरात मरगळ आलेली शैक्षणिक चळवळ गतिमान झाली असेच म्हणता येईल.
सरांनी महाविद्यालय आणि आजूबाजूच्या परिसराचा आधी नीट निरखून अभ्यास केला.
शिवछत्रपती महाविद्यालयाला येण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेले मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी या ठिकाणी त्यांच्याकडे प्राचार्य पदाचा कार्यभार होता. त्यांच्या कार्यकाळात सरांनी अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, व्यसनमुक्त कॉलेजचा परिसर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध उपक्रम, कॉलेजच्या परिसरामध्ये वृक्षारोपण, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत असे एक ना अनेक उपक्रम सरांनी राबवले.
तत्पूर्वी मत्स्योदरी शिक्षण संस्था अंबड या ठिकाणी ते वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामेही केली. त्यामध्ये त्यांनी ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, स्त्री-पुरुष समानता, जलसंवर्धन कार्य, स्त्री साक्षरता, सामाजिक साक्षरता, असे एक ना अनेक विविध उपक्रम त्यांनी राबवून विद्यार्थी आणि पालकांमध्ये समन्वय साधण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. त्याची दखल घेऊन मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एड. अंकुशराव टोपे यांनी शैक्षणिक वर्ष 1996 मध्ये मत्स्योदरी सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याचप्रमाणे हे महाविद्यालय माझं आहे आणि महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी माझेच आहेत ही जाणीव ठेवून विद्यार्थी आणि शिक्षकांना सोबत घेऊन अत्यंत कमी वेळेतच शिवछत्रपती महाविद्यालय जिल्ह्यापुरतं, तालुक्यापुरतं,गावा पुरतं मर्यादित न ठेवता शिवछत्रपती महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नावलौकिक कसा होईल याकडे त्यांनी लक्ष दिलं. माय माखल्या नजरेने बघणारे आणि तुपात भिजलेल्या शब्दांनी बोलणारे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे अशी उपमा दिली तर वावगे ठरणार नाही. शिवछत्रपती महाविद्यालय फक्त पाचोड किंवा छत्रपती संभाजीनगर एवढ्या पुरतं मर्यादित न राहता महाविद्यालयाने महाराष्ट्रात ग्रामीण महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन स्पर्धा 2021-22 मध्ये आदर्श महाविद्यालय आणि उत्कृष्ट प्राचार्य म्हणून राज्य स्तरीय द्वितीय पारितोषिक, २०२२- २३ मध्ये शिवछत्रपती महाविद्यालयाला राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक तर विभागीय प्रथम जिल्हास्तरीय, आणि प्रथम महाविद्यालय उत्कृष्ट समन्वयक प्रथम महाविद्यालय, तर उत्कृष्ट समन्वयक द्वितीय असे एकूण पाच पुरस्कार तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे सरांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे सर्व पुरस्कार म्हणजे पाचोडकरांचा सन्मानच आहे. मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिक्षण महर्षी ऍड.अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या सानिध्यात आणि शिस्तीत सरांची जडणघडण झाल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेपण दिसून येते.

आज सरांना शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये तीन वर्षे पूर्ण होत आहेत. नुकताच प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांना राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने सन 2025 चा मानाचा मराठवाडा भूषण पुरस्कार संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय सिरसाट, दिल्ली येथील राष्ट्रीय पत्रकार अशोक वानखेडे, पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष संजय भोकरे, एबीपी माझाच्या निवेदिका सरिता कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी महाविद्यालयातील मागील तीन वर्षातील केलेल्या कामाचा घेतलेला हा आढावा ;

०१. महाविद्यालय परिसराचे सुशोभीकरण.

  1. महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण.
    ०३. महाविद्यालयाला नॅकचा B+ दर्जा प्राप्त.
  2. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्य.
  3. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय. अर्थशास्त्र परिषदेचे यशस्वी आयोजन.
  4. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयाला राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय म्हणून दोन वेळा (2021-22 आणि 2022-23) पुरस्कार.
  5. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध.
  6. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाईन न्यूज पेपर वाचण्याचे सुविधा उपलब्ध.
  7. शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये वित्तीय साक्षरता या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.
  8. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कटिबद्ध.
  9. महाविद्यालयाच्या इमारतीसाठी आणि इतर सोयी सुविधा साठी पीएम उषा योजनेअंतर्गत पाच कोटी रुपये अनुदान निधी प्राप्त.
    १२. प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम.
    १३. नुकताच लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे लोकमत ग्लोबल एज्युकेशनल एक्सलन्स अवार्ड 2024 हा पुरस्कार अझरबैजान देशाच्या बाकु या पर्यटन राजधानी शहरांमध्ये दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त झाला.
  10. ग्लोबल मॅनेजमेंट कौन्सिल, अहमदाबाद या संस्थेकडून सन 2023 मधील राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त.
  11. मनुष्यबळ लोक विकास अकॅडमी, मुंबई या संस्थेकडून राज्य स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्राचार्य पारितोषिक 2023 प्राप्त.
  12. पुरोगामी सामाजिक आणि सांस्कृतिक महासंघ, पार्वती प्रतिष्ठान तथा सामाजिक जनकल्याण संस्था, संभाजीनगर यांच्या वतीने स्नेहलता मारुतीराव पाटील जिवन गौरव पुरस्कार 2025 प्राप्त.
  13. श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळ, धुळे आणि रिअल इंडो ग्लोबल व्हीजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाऊंडेशन, धुळे या संस्थेकडून समाजरत्न पुरस्कार 2025 प्राप्त.
  14. प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी मराठा समाजासाठी कुणबी नोंदणीच्या आधारे ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून वृत्तपत्रातून अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केले आहेत. तसेच विविध टिव्ही चॅनलवरुन मराठा समाजाच्या ओबीसी (OBC) प्रवर्गातील आरक्षणाकरिता चर्चेमधुन आग्रहाची भूमिका महाराष्ट्र समोर मांडली आहे.
    शिवछत्रपती महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून काही
    आगामी योजना.
    १ महाविद्यालयाचे विद्यार्थी एमपीएससी तसेच यूपीएससी च्या स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून वर्ग १ व २ श्रेणीचे अधिकारी व्हावेत करिता विशेष प्रयत्न.
    २. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी नव उद्योजक बनावेत म्हणून विशेष मार्गदर्शनाची सोय.
    विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून अहोरात्र काम करणारे प्राचार्य डॉ.चंद्रसेनजी कोठावळे सर यांच्या कार्य आणि कर्तुत्वाला सलाम…सरांच्या नेतृत्वाखाली, या ज्ञानमंदिराने विकासाची नवनवीन शिखरे पादांक्रात केली,जणू काही ज्ञानाचा सूर्य उगवला! आपल्या तीन वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीत, महाविद्यालयाने प्रगतीचा वेगळाच आलेख मांडला.
    प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे सर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अथक परिश्रम घेतात, जसे की एखादा कुशल शिल्पकार दगडाला सुंदर आकार देतो आणि त्यातून एक आकर्षक मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे सर आपल्या मार्गदर्शनाने विद्यार्थी रुपी सुंदर शिल्प घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे त्यांच्या जीवनाला एक योग्य आणि तेजस्वी दिशा देईल. तसेच सरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे मोती वेचले. त्यातून सामाजिक बांधिलकीची भावना त्यांच्यात रुजवली गेली.
    सरांनी महाविद्यालयात अनेक नवनवीन उपक्रम राबवले,जसे की एखादा माळी आपल्या बागेत नवनवीन फुले फुलवतो. शैक्षणिक,सामाजिक,आणि सांस्कृतिक उपक्रमांची बाग आपण इथे फुलवली. ‘नॅक मूल्यांकनात ‘बी प्लस’ ग्रेड मिळवला.’ जणू शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पीएम उषा अंतर्गत शैक्षणिक निधी मिळवला. त्याचा महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल. सरांनी आर्थिक शिस्त जपली. विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा सुरू केला, जणू त्यांच्या भविष्याचा मार्ग खुला केला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योग जागरूकता निर्माण केली. तुम्ही विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना जगाच्या स्पर्धेसाठी तयार करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    आपण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला,जसे एखादा संगीतकार आपल्या वाद्यातून सुरेल संगीत निर्माण करतो. त्याप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सुरेल संगीताचे जणू उधळणच झाली. आपण एक आदर्श प्राचार्य आहात, जसे दीपस्तंभ जहाजांना मार्गदर्शन करतो.आपण एक प्रेरणादायी,हसतमुख, उत्साही, कार्य मग्न व्यक्ती आहात. आपण कुटुंबाचा आणि महाविद्यालयाचा आधारवड आहात. आपल्या कार्याचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो आणि आपल्याला उत्तम निरोगी आरोग्य लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा…
    आदरणीय प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठाळे सरांना शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड या ठिकाणी आपल्या सेवेचे ०३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा..
    समाजातील शिक्षकांनी आदरणीय प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे सरांचा आदर्श घेऊन आपलं जीवन दैदीप्यमान करावं हाच या पाठीमागचा संदेश आहे…
    शब्दाकांन -श्री. योगेश गुंजकर
    (संस्थापक अध्यक्ष- शोन्या कंन्ट्रक्शन, घनसावंगी)

आदरणीय प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठाळे सरांना शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड या ठिकाणी आपल्या सेवेचे ०३  वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा..

समाजातील शिक्षकांनी आदरणीय प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे सरांचा आदर्श घेऊन आपलं जीवन दैदीप्यमान करावं हाच या पाठीमागचा संदेश आहे…

शब्दाकांन – श्री.योगेश गुंजकर

(संस्थापक अध्यक्ष- शोन्या कंन्ट्रक्शन, घनसावंगी)

प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 प्रदान करताना पालकमंत्री डॉ.संजय सिरसाट,  आ.संजय केणेकर, राष्ट्रीय पत्रकार अशोक वानखेडे, अध्यक्ष संजय भोकरे,  प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे आदी.

प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना सरपंच शिवराज भूमरे पाटील, सर्वश्री मनोहर खालापुरे, अरुण वाघ,  नानासाहेब सरकटे, रामेश्वर लोहिया, राहुल नरवडे, लक्ष्मन बिलोरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *