तब्बल अडीच लाखांचा गुटखा पकडला ; रावेर पोलिसांची कारवाई

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून बुरहानपूर वरून मालवाहू गाडीत मोठ्या प्रमाणालर गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच 8 जूलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रावेर बुरहानपूर रोड वर मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून फैजपूरला कडे मालवाहू गाडी घेऊन जात असतांना रावेर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख व त्यांच्या पथकाने छापा टाकून कार्यवाही केली फैजपूर येथील कल्लू शेख यूनूस या मालकांचा हा गुटखा असून एम ,एच, 04- एच एन क्रमांक च्या मालवाहू गाडी तून वाहतूक करतांना बुरहानपूर रोड वर असलेल्या स्वास्तिक टॉकीज जवळ ही कारवाई करण्यात आली या कार्यवाही त 187 प्रति पाकीट प्रमाणे 3 मोठ्या गोण्या, 198 प्रति पाकीट प्रमाणे 2 गोण्या, 22 प्रति पाकीट प्रमाणे 2 गोण्या असा गुटखा होता यात 2 लाख 34 हजार रुपये किंमती चा गुटखा व 4 लाख किंमत असलेले मालवाहू गाडी असे एकूण 6 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक शेख मुजाहीद शेख रफीक वय 28 या इसमाला अटक करण्यात आली आहे बुरहानपूर येथील इसमा विरूद्ध सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.