ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

जळगाव दि.१८ प्रतिनिधी – सीआयएससीई बोर्डच्या एच झोनलच्या तायक्वोडो स्पर्धा जळगावमधील अनुभूती निवासी स्कूल येथे उद्या दि.१९ रोजी होणार आहेत. १७ व १९ वर्षा आतील मुलं-मुलींच्या या स्पर्धेत जालना, संभाजीनगर, नाशिक, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव मधील सात संघाच्या जवळपास ६० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सकाळी ११ वाजेला या स्पर्धेचे उद्घाटन अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे व महाराष्ट्र तायक्वोडो असोसिएशनचे अधिकृत पंच यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीतेसाठी अजित घारगे, जयेश बाविस्कर, स्पर्धा संयोजक सौ. स्मिता बाविस्कर, मुख्य पंच श्रेयांग खेकरे, पुष्पक महाजन व सहकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *