ताज्या बातम्या

मरीआईचा यात्रोत्सव आजपासून कुस्त्यांची भव्य दंगल

धरणगाव (प्रतिनिधी) / विनोद रोकडे

शहरातील नागरिकांचे आराध्य दैवत मरीआई चा यात्रा उत्सव श्रावण महिन्यातील दर मंगळवारी साजरा होत असतो. दरवर्षी या उत्सवात जळगांव जिल्ह्यातील व धरणगाव तालुक्यातील भाविक मरीआईला आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. या वर्षी ही यात्रा २९जुलै मंगळवारी पहिली यात्रा तर ५ऑगस्ट ला दुसरी तर २₹१२ऑगस्ट तिसरी तर शेवटीची यात्रा १९ ऑगस्ट होईल.

या यात्रेत कुस्त्यांची दंगल ही भाविकांचे विशेष आकर्षण असते या कुस्त्याची दंगलीत महाराष्ट्र नव्हे तर देशातील नामवंत पहिलवान आपले डाव दाखवून कुस्ती शौकीन चे आकर्षन ठरते तसेच शेवटच्या मंगळवारी मानांची कुस्ती ही लावण्यात येते तसेच या ठिकाणी प्रत्येक विजयी पहेलवान वर जी रक्कम लावलेली असते ती रोख स्वरूपात मिळते याने पहेलवान चे मनोबल वाढत असून या ठिकाणी पहेलवान आवर्जून उपस्थित राहतात तसेच मरीआई यात्रेची शोभा वाढविवी म्हणून मोठं मोठे पाळणे शोभेच्या वस्तू खवय्यांनसाठी ही यात्रेत स्टॉल लागलेले असता तर बालगोपाल साठी पाळणे मिकींमाउस आशा विविध प्रकारे यात्रेचे आकर्षन असते या यात्रेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही मोठ्या प्रमाणात भाविकांनि उपस्थित राहण्याचे आव्हान किशोर महाजन व व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *