बाभळे येथे स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

धरणगाव प्रतिनिधी/अजय बाविस्कर.
धरणगाव – तालुक्यातील बाभळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील नागरिक मोतीलाल प्रकाश गजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभुषा साकारल्या होत्या. प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मागासवर्गीय सेना उपतालुकाप्रमुख अमोल गजरे व युवा सेना गटप्रमुख रोहीत पाटील यांनी देखील आपल्या स्वखर्चातुन १ली ते.४थी च्या विद्यार्थ्यांना पन्नास पिण्याच्या पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तेजपाल ठाकुर, शिक्षिका निशिगंधा पाटील,पोलीस पाटील,आशासेविका अंगणवाडी सेविका ,अंगणवाडी मदतनीस तसेच गावातील अमोल गजरे,रोहीत पाटील,मंगेश पाटील,प्रविण पाटील ,शुभम पाटील,मुकेश पाटील,रोनक पाटील,रामकृष्ण पाटील, गौरव पाटील,मोतीलाल गजरे,संतोष पाटील,आशितोष पाटील,समाधान गजरे ,विजय पाटील,नागेश सोनवणे,रामदास गजरे,करण पाटील, दिशांत पाटील,दर्शन पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.