मुसळधार पावसाने दाणादाण, हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान ; शेतकरी मोठ्या संकटात

नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या ; ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांची मागणी
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस दडी मारुन बसला होता. त्यामुळे पावसाची नागरीक चातकासारखी वाट पाहत होते. अखेर पाऊस पुन्हा परतला आहे. पण यावेळी पाऊस त्याचं आक्राळविक्राळ रुप सोबत घेऊन आला आहे. रात्री 10 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला ,या पावसा मुळे धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसताना दिसतोय. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान होताना दिसतंय. धरणगाव येथील धरणी नाल्याला पूर आलेला बघायला मिळाले त्यामुळे गावांमध्ये पाणी शिरलं धरणी नाल्या ची दुरवस्था असल्याने आजूबाजूला असलेला दुकानात पाणी जाऊन व्यापार चे मोठे नुकसान झाले.
नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या ; उपनेते गुलाबराव वाघ
धरणगांव येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने धरणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले, शहरात बरेचशा घरांची पडझड झाली त्या मधे संसाराच्या सामानाचे नुकसान झाले, हे वृत्त समजताच सकाळी ७ वा शिवसेना उपनेते गुलाबरावजी वाघ, मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश भाऊ चौधरी,शहर प्रमुख भागवत आप्पा चौधरी, सुरेश गोविंदा महाजन, व्यापारी सेनेचे दिनेश वाणी, रणजित पुरभे, गजानन माळी, राहुल रोकडे आबा महाजन ,व व्यापारी यांनी सर्व पाहणी केली,व तात्काळ प्रांताधिकारी व तहसीलदार, मुख्याधिकारी धरणगांव, सर्कल, तलाठी यांच्याशी संपर्क करुन ताबडतोब पंचनामा करणे,पाहणी करणे संदर्भात सुचना/विनंती केली.या नुकसान ग्रहस्तांना भरपाई मिळावी अशी ही मागणी केली.ताबडतोब यंत्रणा पाठवतो व आम्हीही येतो असे तहसीलदार व मुख्याधिकारी साहेबांनी सांगितले.