धरणगाव येथे स्मार्ट गर्ल्स कार्यशाळा संपन्न ; भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव येथे भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय स्मार्ट गर्ल्स कार्यशाळेचे समापन एक्स येथील श्री दिंगबर जैन मंदिरात रविवार ता.17ऑगस्ट 2025 रोजी झाले. यात 13 ते 19 वर्ष दरम्यानच्या 27 मुलींनी सहभाग घेतला.
समापन समारोह प्रसंगी अयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्ट्स,कॉमर्स, सायन्स महाविद्यालयाचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे होते. प्रमूख अतिथी भारतीय जैन संघटनेचे विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा तसेच प्रशिक्षक नितीन पोहरे, जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा, श्री जैन संघाचे अध्यक्ष सुमीत संचेती, दिंगबर समाज अध्यक्ष राहूल जैन, प्रतिक जैन, मूर्तिपूजक संघ सदस्य सुशील कोठारी, बीजेएस धरणगावचे अध्यक्ष निलेश ओस्तवाल, उपाध्यक्ष आकाश कुमट,सचिव मयुर चोपडा, एरंडोल अध्यक्ष सागरमल ओस्तवाल, वरिष्ठ पत्रकार कडु आप्पा महाजन, प्रविण कुमट,अलोक कुमट आदी मंचवर उपस्थीत होते.
प्रा.चंद्रकांत डागा म्हणाले, संस्थापक शांतीलाल मुथा हे, आपल्या सखोल अभ्यासाद्वारे समाजाच्या आवश्यकतेनुसार कार्यक्रमात बदल करुन समाजापुढे आणत आहे. त्यापैकी स्मार्ट गर्ल्स हा एक कार्यक्रम होय.या कार्यशाळेत मुलींची स्व ची ओळख, विचार करणे, निर्णय घेणे नाते संबंधातील संवेदनशीलता, समाजाप्रती जागरुकता व नैतिक क्षमता विकसीत केल्या जातात. तसेच संघटनेचे सूरू असलेले फाउंडेशन प्रोग्राम,परिणय पथ,दिल का जिकशा,अल्पसंख्याक व एमएसएमई आदी कार्यक्रमा बद्दल माहिती दिली. प्रशिक्षक नितीन पोहरे यांनी स्मार्ट गर्ल हा शांतीलाल मुथा यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.आपल्या मुली या आनंदात राहाव्यात, त्यांना कोणतही परेशानी येऊ नये या उद्देशाने तयार केला आहे. याचे एकूण 8सत्र आहेत.शेवटच्या सत्रात मुलींच्या पालकांनाही बोलावले जाते. निर्मल बोरा, निलेश ओस्तवाल, कडु आप्पा महाजन यांनी मनोगात व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मिलींद डहाळे म्हणाले, शांतीलाल मुथा यांच्याकडे व्हिजन आहे. किल्लारी भूकंपातील 1200 विद्यार्थ्यांचे पुनर्वसन पुणे येथे त्यांनी केले. तेथे शिकलेला सपकाळे नावाचा विद्यार्थी माझ्या संस्थेत फिजिकल डायरेक्टर पदाच्या मुलाखतीसाठी 4 वर्षापूर्वी आला होता. तो शिरपूर कॉलेजला कार्यरत आहे. संघटनेच्या कार्याला मी सॅल्युट करतो. इंग्लिश मिडीयम स्कूल संघटनेने सूरू कराव्यात ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन गितेश ओस्तवाल यांनी केले तर पंकज दुगड यांनी आभार प्रदर्शन केले.