राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झंझावात सुरूच…

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने “गाव तेथे राष्ट्रवादी” अभियानाचा झंझावात सोनवद – पिंप्री गटात उत्साहात सुरु झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गावागावात जाऊन निष्ठावंत शिलेदारांच्या भेटीगाठी घेण्याचे काम सातत्याने सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया एकच ऐकायला मिळाली आमचा पक्ष म्हणजे फक्त आणि फक्त पवार साहेबच. आर्थिक आमिष किंवा लाभाच्या पदांच्या मागे न पडता निष्ठा काय असते याचा प्रत्यय “गाव तेथे राष्ट्रवादी” अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सोनवद – पिंप्री गटात निष्ठावंत शिलेदारांच्या भेटी घेऊ पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये पक्षाचे जेष्ठ नेते अंजनविहिरेचे डॉ. विलास चव्हाण, रविआबा पाटील, शरद पाटील, प्रदीप चव्हाण, चमगांवचे खंडा बापू, रमेश ताराचंद पाटील, सुदाम फकीरा पाटील, प्रेमराज शांताराम पाटील, प्रकाश लटकन पाटील, पृथ्वीराज पाटील बाभुळगावला राहुल हुकूमचंद पाटील, गोपाल धनराज पाटील, विजय संतोष कोळी आदी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच अहिरे येथे समाधान (भैय्या) पाटील व विजय पाटील यांच्या वडिलांच्या प्रकृतीची सुश्रुषा केली तसेच सोनवद येथे रामभाऊ भिका पाटील यांच्याकडे द्वार दर्शनाच्या निमित्ताने भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्वल पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, युवानेते साईनाथ पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आदी उपस्थित होते.