धरणगाव शिवसेना उ बा ठा ची पालिकेच्या प्रभाग रचनेवर जोरदार हरकत ; राजकीय दबावाला बळी पडून प्रभागांची रचना केल्याचा आरोप

बहुतांश ठिकाणी नियमांची पायमल्ली
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना तयार करतांना राजकीय दबावाखाला प्रभागांची रचना करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप धरणगाव शिवसेनेचे उ बा ठा चे पदाधिकारी निलेश चौधरीयांनी केली आहे. सत्ताधारी गटाने आपल्या राजकीय फायद्याच्या दृष्टीने सोयीची अशी प्रभाग रचना बनवून घेतली असल्याचाही श्री. चौधरी यांचे म्हणणे आहे.जाणून घ्या…माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हा प्रमुख निलेश सुरेश चौधरी यांनी तक्रारी नेमकं काय म्हटलेयनिलेश चौधरी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रगणक गटनिहाय माहिती देण्यात आलेली नाही. तसेच नकाशावर देखील त्यासंबंधी कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ प्रगणक गटाचा प्रभाग रचना तयार करतांना कुठलाही विचार करण्यात आल्याचे दिसून येत नाही. जनगणना प्रभागांच्या सीमा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. परिशिष्ट क्रमांक ७ नोटीस बोर्डावर दर्शविण्यात आलेला नाही. तसेच त्याची सत्यप्रत देण्यात यावी, प्रत्येक प्रभागात मुद्दाम हून मुस्लीम वस्ती, गरीब वस्ती (स्लम एरिया) समाईकरित्या विभागून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जेणेकरून या गोर गरीब व गरजू लोकांना पैश्यांचे आमिष दाखवून निवडणुकीत सत्ताधारी गटाला प्रभाव टाकता येईल. सध्या गुगलमध्ये समाविष्ट असलेले बरेचसे भाग नकाशात दिसून येत नाहीत. त्यामुळे गुगलवर नव्याने तयार असलेल्या नकाशाचा वापर केल्याचे दिसून येत नाही.सर्रासपणे नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोपप्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लाय ओव्हर इत्यादींचा विचार न करता सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रभाग रचनेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते. यासंदर्भात भौगोलिक स्थिती तथा सामाजिक गणना याचा विचार न केल्याने अनेक वस्त्यांचे विभाजन झालेले आहे. ते खालील प्रमाणे-अ) समाजानुसार भाग विभागलेले असून देखील समाज दर्शविणारे भाग नकाशात दाखविण्यात आलेले नाहीत. जसे की, हनुमान नगर , मराठे गल्ली लहान माळी वाडा, मोठा माळीवाडा, भोई वाडा, पारधी वाडा, हमाल वाडा, मुस्लीम भाग, बेलदार मोहल्ला, गौतम नगर या भागांचे विभाजन स्पष्टपणे दिसून येत नाही. जे प्रभागानुसार प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर दिसून येते.आ) विविध समाजाचा उदा: माळी समाज, तेली समाज, मुस्लीम समाज, दलित समाज, ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भोई समाज यांचा भाग फोडलेला दिसून येतो.इ) प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. स्वतंत्र प्रभागाची दिल्यास मुस्लीम समाज कशाप्रकारे विभागाला गेला आहे?, हे स्पष्टपणे दिसून येईल. प्रत्येक प्रभागाचा नकाशा स्वतंत्र तयार करण्यात आलेला नाही.उदाहरण : प्रभाग क्रमांक ११ हा बनवितांना एनएच ६ हा मुख्य रस्ता तसेच त्यावरील सावित्रीबाई फुले उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.तरी वरील सर्व परिस्थिती पाहता राजकीय हिताच्या दृष्टीने व राजकीय दबावाला बळी पडून सदरची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर रचना ही त्रयस्त यंत्रणेमार्फत उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तयार करण्यात यावी, अशी मागणी देखील माजी लोकनियुक्तनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हा प्रमुख निलेश सुरेश चौधरी यांनी केली आहे.


