ताज्या बातम्या
पत्रकार किशोर वागदरीकर च्या लेखणीची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतली दखल

नांदेड (दिपक मठपती) – नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या द्वितीय गुणपत्रिकेवर डुप्लिकेट कॉपी अशी प्रत दिली जात होती. यासाठी पत्रकार किशोर वागदरीकर यांनी डुप्लिकेट च्या बदल्यात ‘द्वितीय प्रत’ हा शब्द प्रयोग करण्यास सुचवले. आणि मा कुलगुरू यांच्याकडे पाठ पुरावा केला. कारण डुप्लिकेट या शब्द मुळे संभ्रम होत आहॆ, असे पत्र माध्यमातून विद्यापीठाकडे पत्र दिले. आणि विद्यापीठाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येवून डुप्लिकेट ऐवजी द्वितीय प्रत असा मार्क / मेमो विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.


