धरणगाव नगर परिषदेमार्फत ” स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबीर’ उपक्रमाचे यशस्वी आयोजन

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे
धरणगाव नगरपरिषद, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने “सेवा पंधरवाडा व स्वच्छता ही सेवा २०२५” या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबीर व हेल्थ कार्ड वाटप उपक्रम दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषद उद्यानासमोरील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे आयोजित करण्यात आला. या उपक्रमात नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी सफाई कर्मचारी व सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी सकाळी 7.30 पासूनच उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. 🔬 *उपक्रमाची वैशिष्ट्ये:*▪️ नगर परिषदेशी संबंधित एकूण 138 अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांची सखोल प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. ▪️ या आरोग्य तपासणीमध्ये विविध रक्त चाचण्या CBC, Blood Sugar, Hemoglobin, Thyroid तसेच ब्लड प्रेशर, मुख व स्तनाचा कर्करोग यासारख्या गंभीर आजारांच्या देखील तपासण्या करण्यात आल्या.▪️ सर्वांना उपाशीपोटी बोलावून त्यांची जेवणापूर्वीची रक्त तपासणी करण्यात आली.▪️नगरपरिषदेचे नगरपरिषदेमार्फत आरोग्य तपासणीनंतर सर्वांसाठी चहा व नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली. ▪️तपासणीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य अहवालासहित हेल्थ कार्ड प्रदान करण्यात आले.या उपक्रमातून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, तसेच नियमित वैद्यकीय तपासणीसाठी प्रोत्साहन देणे, हा उद्देश साधण्यात आला.🎤 कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. महेंद्र सूर्यवंशी (तहसीलदार, धरणगाव) – यांनी आपल्या भाषणात सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या आरोग्य रक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.मा. रामनिवास झंवर (मुख्याधिकारी, धरणगाव नगरपरिषद) – यांनी सांगितले की, सफाई मित्र हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे.डॉ. संजय चव्हाण (तालुका आरोग्य अधिकारी) – यांनी वैद्यकीय तपासणीचे महत्त्व सांगत, सर्व कर्मचारी वर्गाने दरवर्षी अशी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले.🌿 सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य संरक्षणाचा ठोस पाऊलधरणगाव नगरपरिषदेच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाणार आहेत. “स्वच्छता ही सेवा” ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता, प्रत्यक्ष कृतीत उतरवली जात आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक भिकन पारधी, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांचेसह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे डॉ. रोहिणी शिंदे, डॉ. शुभम जाधव, डॉ तुषार मेहेडे, मयूर पाटील, आर के देशमुख यांचे सह सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


