धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ; रोटरी क्लब व गुरुदत्त बहुउद्देशीय सेवा मंडळाचा उपक्रम

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
रोटरी क्लब ऑफ धरणगाव व गुरुदत्त बहुउद्देशीय सेवा मंडळ, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ०५ या वेळेत वाणी समाज मंगल कार्यालय, धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“आपले रक्तदान रुग्णांचे प्राण वाचवू शकते” या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. ए. आर. पाटील (अध्यक्ष), डॉ. अतुल शिंदे (सचिव), डॉ. किरण पाटील (खजिनदार), डॉ. मनोज अमृतकर (वैद्यकीय समिती अध्यक्ष) मनोज ठाकरे , (सार्जंट) रवींद्र हरपे, किशोर येवले, डॉ. अभिजीत पाटील, भैय्या भाऊ मराठे, डॉ.पराग कुलकर्णी शुभम माळी, दिनेश माळी, श्री सुनील चौधरी रोहित अग्निहोत्री नितीन पाटील हर्षल पाटील चंदन पाटील राकेश सोनार श्री सुधाकर वाणी श्री दिलीप रामू पाटील व श्री निलेश चौधरी श्री प्रशांत केले श्री कडू आप्पा बयस श्री ललित येवले डॉ. पंकज अमृतकर डॉ सुचित जैन डॉ धनंजय पाटील डॉ धनराज देवरे नामदेव मराठे कल्पेश महाजन विजयकुमार शुक्ला तसेच रोटरी क्लब ऑफ धरणगावचे सर्व सदस्य व गुरुदत्त बहुउद्देशीय सेवा मंडळाचे सभासद उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रक्तदाते यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


